जयदीप शिंदे कुटुंबीयास मेरुलिंग महादेवाचा सदैव आशीर्वाद : विनायक जंगम
शिंदे कुटुंबीयांकडून श्रीक्षेत्र मेरुलिंग शंभू महादेवाचा महारुद्र अभिषेक संपन्न

सायगाव : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील श्रीक्षेत्र मेरुलिंग येथील शंभू महादेवाचे पिंड हे स्वयंभू पिंड आहे. या शंभू महादेवाची महती अपार अशी आहे. अशा श्रीक्षेत्र मेरुलिंग येथील स्वयंभू शंभू महादेवाचा जयदीप शिंदे यांच्या कुटुंबीयास सदैव आशीर्वाद राहील. असे प्रतिपादन श्रीक्षेत्र मेरुलिंग महादेव मंदिराचे सेवेकरी विनायक जंगम यांनी केले.
आज गुरुवारी श्रीक्षेत्र मेरुलिंग स्वयंभू शंभू महादेव मंदिर नरफदेव येथे जावळी-महाबळेश्वर बाजार समितीचे चेअरमन युवा नेते जयदीप शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री शिंदे यांच्यासह मातोश्री बेबीताई,कन्या अनोहा, चिरंजीव रीदांश अशा शिंदे कुटुंबीयांच्या हस्ते शंभू महादेवाचा अभिषेक करण्यात आला.
यावेळी जंगम म्हणाले शिंदे कुटुंबीय हे नेहमीच श्रीक्षेत्र मेरुलिंग येथे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी न चुकता येत असतात. त्यांना यापुढील वाटचालीत श्रीक्षेत्र मेरुलिंग शंभू महादेव यश देवो, भरभराट देवो अशी प्रार्थना महारुद्र अभिषेक दरम्यान नरफदेव वासीय व जंगम परिवाराच्या वतीने आम्ही करतो.
यावेळी जयदीप शिंदे व सुविद्य पत्नी भाग्यश्री शिंदे तसेच मातोश्री कन्या व चिरंजीव अशा सर्व शिंदे कुटुंबीयांच्या वतीने मासिक महारुद्र अभिषेक, तसेच दहिभात पिंड सेवन पूजा करण्यात आली. तसेच शंभू महादेवाची महाआरती उपस्थितांच्या हस्ते संपन्न झाली. तद्नंतर महाप्रसादाचे आयोजन देखील अन्नदाते अंकुश साबळे महाराज नरफदेव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अशोक साबळे, विशाल साबळे, सचिन साबळे, सरपंच निर्मला साबळे, भिकू जंगम, शांताराम साबळे, नवनाथ साबळे,सुधाकर जंगम, निलेश जंगम, बाबू जंगम यांच्यासह ग्रामस्थ, महिला, भजनी मंडळ नरफदेव उपस्थित होते.



