सांस्कृतिक

भालेघरे कुटुंबीयांनी उभारलेल्या ३७ फूट विठ्ठलमूर्ती जवळ आषाढी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा

जावळी तालुक्यातील कोलेवाडी गावचे भालेघरे कुटुंब हे सांप्रदायिक चळवळीतील असल्याभुळे या कुटुंबतील उद्योजक दता शेठ भालेघरे यांनी पाचगणी रस्त्यावरील अभिनव अॅग्रो फार्म येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी ३७ फुट उंचीची विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.याठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात हे कुटुंबीय आषाढी साजरी करतात. यावर्षी देखील येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कमलेशशेठ भालेघरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सकाळी मान्यवरांचे हस्ते ८:०० वा दुग्धाभिषेक पंचक्रोशीतील तसेच बामणोली हायस्कूल च्या ढोल लेझीम पथकाने सलामी देऊन दिवसभर महाराष्ट्रातील नामवंत असे भक्ती संगीतांचे कार्यक्रम सुरू राहतील.त्याच प्रमाणे दुपारी १२:०० चे नंतर परिसरातील गावोगावचे दिंड्यांचे आगमण आणि त्याच बरोवर शाळकरी मुलांच्या दिंडयां सोबत पथनाटये इ. सादरीकरण होईल.

असे असतील कार्यक्रम

सकाळी ८:०० वा. मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक

सकाळी ८:३० वा. बामणोली हायस्कूल दोल-लेझीम पथकाची सलामी

दुपारी १२:०० नंतर पंचक्रोशीतील दिंड्यांचे आगमन, शाळकरी दिंड्या, पथनाटये व सांस्कृतिक सादरीकरणे

दुपारी २:०० ते ४:०० प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व त्यांचे शिष्य गौतम हराळ यांचा भक्ती संगीत कार्यक्रम

सायंकाळी ४:०० ते ६:३० गायक विरेंद्र केजळे यांचा ‘साज’ हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम

भव्य विठ्ठलमूर्तीच्या साक्षीने होणाऱ्या या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भालेघरे कुटुंबीय व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button