
मुंबई वास्तवनामा वृत्तसेवा
जावळीच्या दक्षिण पट्ट्यातील सर्व गावांवर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष लक्ष आहेच.त्यामुळेच या विभागातील प्रत्येक गावात कोट्यावधींची विकास कामे राबवण्यात आली आहेत. यापुढेही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांचे दक्षिण पट्ट्यातील गावांवर लक्ष राहील.तसेच मालचौंडीकरांच्या पाठीशीदेखील आपण सदैव राहणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.
मुंबई स्थित मालचौंडीकर युवकांनी जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवजीवन क्रिकेट क्लब मालचौंडी यांनी श्री काळेश्वरी चषक २०२५ चे मुंबई येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमात रांजणे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सागर धनावडे,विठ्ठल वारकरी संप्रदायाचे संस्थापक प्रवीण महाराज शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई दुधाने, दत्तात्रय कदम, संजय कदम ,संदीप पाटील ,मुंबई स्थिर ग्रामस्थ हरिभाऊ कदम ,रमेश कदम, आनंदा कदम ,अशोक रावले , रमेश पाटील ,सागर जवळ ,प्रणित शेलार ,विनोद शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते .
मालचौंडी गावाने कायम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना साथ दिली आहे. यापुढेही गावातील ग्रामस्थांनी भाजपच्या पाठीशी ठामपणे कायम उभे राहावे, असे आवाहन रांजणे यांनी यावेळी केले. तर मालचौंडी गाव कायम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच ज्ञानदेव रांजणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई दुधाने यांनी यावेळी दिली.
श्री काळेश्वरी चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत खर्शीबारामुरे संघ प्रथम ,कुसुंबी संघ द्वितीय ,बोलाई आंबेघर संघ तृतीय, नेहरू युवा गांजे संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. संदेश पवार कुसुंबी हा मालिकावीर ठरला ,तर खर्शीबारामुरे येथील संदीप बिरामणे खेळाडू उत्कृष्ट फलंदाज ,बोलाई आंबेघर संघातील सागर शेलार उत्कृष्ट गोलंदाज ,गांजे संघातील अमित चिकणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला .सर्व विजयी संघांना संचालक ज्ञानदेव रांजणे व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.



