सांस्कृतिक

साताऱ्यात गुरुवारी भीमफेस्टिव्हलचे आयोजन

फेस्टिव्हलची तयारी पूर्ण झाल्याची संजय गाडे यांची माहिती

सातारा :वास्तवनामा 

 छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती तसेच डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ऐतिहासिक गांधी
मैदान येथे गुरूवार, दि. १४ मे रोजी ‘भीम फेस्िव्हल चे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवरआधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या काव्यात्मक व्याख्यानाचे विशेष आकर्षण असणार आहे.सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या फेस्टिव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या
हस्ते व प्रतिमा पूजन खा. उदयनराजे भोसले, खा. नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे, आ. मनोज
घोरपडे, आ. डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.कार्यक्रमास
न्यायालयाचे माजी न्यायमूती भूषण गवई, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गरवई तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अँंड. दत्ता बनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गाड़े आणि गणेश भिसेअसणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून सुहास मोरे,विशाल कांबळे, रेखा सकटे आणि अॅँड. पायल गाड़े काम पाहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button