नवीमुबंईत नगरसेवकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सौरभ शिंदेंची गावच्या मातीशी नाळ कायम
करहर येथे नेत्रतपासनी शिबीराचे आयोजन; सौरभ शिंदे यांचा सामाजिक उपक्रमातून सेवाभाव

करहर : वास्तवनामा वृत्तसेवा
नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असतानाही आपल्या गावाशी आणि गावच्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणारे नगरसेवक सौरभ ऋषिकांत शिंदे यांनी जावळी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून सौरभ ऋषिकांत शिंदे फाउंडेशन आणि आर. झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करहर येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे गुरुवारी २० ऑगस्ट रोजी करहर येथे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवार २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, लक्ष्मी हॉटेलसमोर, शिवसेना भवन, करहर, ता. जावळी, जि. सातारा येथे नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे डोळ्यांची तपासणी तसेच आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत करून घेणे शक्य होत नाही. ही गरज लक्षात घेऊन सौरभ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी तसेच शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जावळी परिसरातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी विशेष सुविधा
शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी सोबत आधारकार्ड व रेशनकार्डची झेरॉक्स प्रत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रक्तदाब (BP) किंवा मधुमेहासाठी (शुगर) औषधे सुरू असतील तर ती औषधेही सोबत आणण्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांच्या पेशंटला ऑपरेशनसाठी जाण्या-येण्याची, राहण्याची, जेवणाची तसेच परत आणून सोडण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील रुग्णांना या उपक्रमाचा विशेष फायदा होणार आहे.तरी जावळी तालुक्यातील नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मा. श्री. सौरभ ऋषिकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.



