मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी माता-भगिनींना घडवले पांडुरंगाचे दर्शन
अखंडपणे गेली १५ वर्षांपासून घडवत आहेत पांडुरंगाचे दर्शन

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा
वारकरी संप्रदायाची सेवा हीच ईश्वरसेवा मानत जावळी तालुक्यातील भाजप मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी गेल्या सलग १५ वर्षांपासून शेकडो वारकरी, विशेषतः माता-भगिनींना मोफत पंढरपूर वारी, लोणंद पालखी दर्शन, तरडगाव पायी वारी तसेच अन्नदानाची सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक वारकऱ्यांना “याची देही, याची डोळा” श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्याची संधी दरवर्षी मिळत आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संदीप परामणे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत वाहन व्यवस्था, लोणंद येथे पालखी दर्शन, तरडगावपर्यंत पायी वारीत सहभाग तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात येते. या सेवेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व भाविकांना पंढरीची वारी सुखकर होत असून वारकरी वर्गातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

सामाजिक व धार्मिक कार्यात सातत्य ठेवणारे संदीप परामणे यांनी आपले वडील प्रतापराव परामणे यांच्याकडून मिळालेला सेवाभाव जपला आहे. तसेच ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांच्या विचारांचा वारसा स्वीकारत समाजहिताची कामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक म्हणूनही ते परिचित असून त्यांच्या प्रेरणेतून विविध सामाजिक उपक्रम ते दर्सवर्षी राबवित असतात.
धार्मिक सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा करणाऱ्या त्यांच्या या कार्यामुळे जावळी तालुक्यात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेतून समाजाशी नाळ जोडणाऱ्या या उपक्रमामुळे संदीप परामणे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



