सोमर्डी येथे भव्य किल्ले स्पर्धा संपन्न

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील शिवजन्मोत्सव मंडळ व ग्रामस्थ मंडळ सोमर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी सणानिमित्त भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलांना इतिहास समजावा व त्यांच्यामध्ये संस्कार मूल्य रुजली जावीत,या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आले होत्या.
या स्पर्धेमध्ये २० मावळ्यांनी ऊस्फुर्तपणे सहभाग नोंदवला, व आपापल्या परीने किल्ल्यांना नैसर्गिक जिवंतपणा दाखवण्याचा प्रयत्न केला.या परीक्षेचा परीक्षकांनी परीक्षण करून सार्थक अमोल परामणे याचा प्रथम क्रमांक ,सक्षम प्रशांत शेलार द्वितीय ,आर्यन राहुल परामणे तृतीय,आलोक दत्तात्रय परामणे चतुर्थ, तर ओमकार मंगेश परामणेचा पाचवा क्रमांक या स्पर्धेमध्ये आला.
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. किल्ले परीक्षण करण्यासाठी सोमवारी गावचे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते रमेश परामणे, संदीप परामणे, संतोष शेलार ,संजय परामणे, तुषार तरडे ,नितीन परामणे ,अविनाश परामणे,प्रशांत शेलार, तुषार परामणे, अंशुल परामणे, डॉक्टर साक्षी परांमणे, साची परामणे आदींनी परीक्षण केले



