कुडाळ गटात भाजपकडून निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळावी
मोनालीताई बारटक्के यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा
गेल्या काही दिवसापासून पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जावळी तालुक्यात राजकीय रणधुमाळी सुरू झालेली असतानाच तालुक्यातील हाय व्होल्टेज समजला जाणाऱ्या कुडाळ जिल्हा परिषद गटात महिला ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने या गटातून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कुडाळ हे जिल्हा परिषद गटातील सर्वाधिक मोठे लोकसंख्येचे गाव असल्याने कुडाळ गटाचा उमेदवार हा कुडाळालातील असणार हे निश्चित.भाजपकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांला या गटाची उमेदवारी मिळावी असा आग्रह गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यामधून होत आहे.
या गटामध्ये नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्यासह विरोधी गटातून दीपक पवार यांचे प्राबल्य असून गेल्या तीन टर्म पासून या गटावर दीपक पवारांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे यावेळी मात्र हा गट आपल्या ताब्यात यावा यासाठी भाजप पक्षाने कंबर कसली असून, कोणतेही परिस्थितीत यावेळी कुडाळ जिल्हा परिषद गट ताब्यात घ्यायचा या हेतूने भाजपने जोरदार काम सुरू केले आहे.या गटावर कारखाना गटाची मजबूत पकड असून,स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या घराण्याची व नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी व पक्षाशी गेल्या वीस वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या व खऱ्या अर्थाने निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य शोभाताई बारटक्के यांच्या कुटुंबातील त्यांच्या स्नुषा मोनाली ताई महेश बारटक्के यांना या गटातून भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात यावी यासाठी कुडाळ गटातील कार्यकर्त्यांमधून जोरदार मागणी होऊ लागली आहे,
बारटक्के कुटूंबीय हे भाजप पक्ष तसेच नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचाराशी कोणत्याही सत्तेशिवाय व पदाशिवाय कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यामुळे कुडाळ जिल्हा परिषद गटातून सौ मोनाली ताई महेश बारटक्के यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी होत असून त्याच या गटातील प्रबळ दावेदार मानले जात आहेत.



