सामाजिक

वडिलांचा ‘वारसा’ नेटाने चालवणारे संदीप परामणे

निमित्त वाढदिवस

   जावळी तालुक्यातील सोमर्डी सारख्या छोट्याशा गावात राजकारणापेक्षा समाज कामात जास्त रस असणारे प्रतापराव परामणे यांची  समाजशील नेतृत्व म्हणून तालुक्यात एक वेगळी ओळख होती. प्रतापराव परामणे यांनी समाजशीलतेचा जो वसा व वारसा घालून दिला आहे. तोच वसा व वारसा संदीप परामणे हे नेटाने पुढे चालवत आहेत. तर हे करीत असताना वसंतराव मनकुमरे यांचे मानसपुत्र म्हणून देखील ते राजकारणात सक्रिय राहिले आहेत. भाजप तालुका मंडलअध्यक्ष म्हणून ते ती जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत.अशा समाजशील नेतृत्व असलेल्या संदीप प्रतापराव परामणे यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने …!!

आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांसाठी पैशांचा भरमसाठ व्यापार बाजार मांडलेला असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खास स्पर्धा परीक्षा स्पर्धेत सक्षमपणे टिकून उज्वल यश मिळवावे त्यांनी या व्यापारामध्ये वाहून जाऊ नये, विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षा बद्दल योग्य ते मार्गदर्शन मिळावे या तळमळीने सोमर्डी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालय व  स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना संदीप परामणे यांनी केवळ ७० पुस्तके घेऊन सुरुवात केली. आज हे वाचनालय व  स्पर्धा परीक्षा केंद्र हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे,वाचकांचे आधारवड म्हणून ओळखले जात आहे.
अशा या समाज उपयुक्त उपक्रमाचा शुभारंभ अविनाश धर्माधिकारी सरांच्या शुभहस्ते परामणे यांनी केला. हा उपक्रम सध्या जावली तालुका पातळीवर सुरू आहे. जावली तालुका हा माथाडी कामगारांचा तालुका ही विचारधारा मोडून जावली तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा यासाठी परामणे यांची मोठी तळमळ या निमित्ताने पाहायला मिळते. “मी मंदिरात न जाता मनशांतीसाठी ग्रंथालयात येतो पुस्तकेच मला जीवनाचा मार्ग निवडण्यासाठी प्रेरित करतात” असे परामणे नेहमी म्हणतात. “निवांत विकासालय” या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मीरा बडवे यांच्या मार्फत परामणे यांनी ग्रंथालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके व विशेष मार्गदर्शन देखील उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचा फायदा जावली तालुक्यातील गरजू आणि होतकरु अशा विद्यार्थ्यांना आज होताना दिसत आहे.
जावली तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने जावली तालुक्यातील सोनगाव,सोमर्डी,शेते, सरताळे, गणेशवाडी, कापसेवाडी, धोंडेवाडी, अंबिका नगर या गावातील आठ शाळा दत्तक स्वरूपात घेऊन त्या शाळांमध्ये मोफत ग्रंथालय सुरू करून मुलांसाठी परामणे यांनी पुस्तके पुरवली. वाचन संस्कृती जपण्यासाठी सतत धडपड त्यांची राहिलेली आहे. एक पाऊल स्वच्छतेकडे याप्रमाणे गाव पातळीवर स्वच्छता उपक्रमात देखील त्यांनी सहभाग नोंदवून लोक सहभागातून स्थानिक पातळीवर स्वच्छता शिबिरांचे आयोजन केले. स्वच्छतापर जनजागृती मार्गदर्शन करणे त्याचबरोबर दत्तक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांमार्फत वैयक्तिक स्वच्छता विषय प्रात्यक्षिके व मार्गदर्शन देखील त्यांच्याकडून होताना दिसून येते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे अतिशय पर्यावरण प्रेमी व्यक्तिमत्व असलेले परामणे कोणतेही काम करायचे म्हटले तर ते स्वतःपासून सुरुवात करतात. मग यातही ते मागे पडले नाहीत.गेले कित्येक वर्षात ते स्वतः दरवर्षी झाडे लावतात व ती जगवतातही. सर्व तरुण-तरुणींना याबद्दल मार्गदर्शन देखील करतात. आजच्या धावत्या बदलत्या युगात संतांचे आचार विचार अंगीकारले पाहिजेत असे त्यांना नेहमी वाटते त्यातूनच त्यांनी ग्रामस्थांना घेऊन पायी दिंडी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सोमर्डी गावात सुरू केला.
गावकरी,अभ्यासिकेतील मुले यांचा सहभाग घेऊन दिंडीचे आयोजन त्यांच्याकडून होते. सर्व स्वखर्चातून या दिंडीचे नियोजन ते उत्तमरीत्या दरवर्षी करीत असतात. ग्रामीण भागातील शेतकरी महिला तसेच इतर नागरिकांची वेळेची बचत व्हावी बँकांच्या रांगांमध्ये उभे राहण्याचा त्रास कमी व्हावा या हेतूने सोमर्डी गावातच आराम मिनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा त्यांनी सुरू केली आहे. गावातील तसेच तालुक्यातील लोकांना सर्व दाखले, सातबारा उतारे,इंटरनेट सुविधा त्यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे.
स्वयं सहाय्यता महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना बचतीची सवय परामणे यांनी लावत त्यांचा आर्थिक व्यवहार सुकर व्हावा म्हणून महाराष्ट्र बँकेची  मिनी बँक शाखा उपयुक्त ठरते. त्यांच्या सामाजिक कार्याचे दखल घेऊन सातारा जिल्हा आदर्श ग्रंथालय पुरस्कार त्यांनी पटकावला. त्याचबरोबर सहकार पुरस्कार ,यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामीण संचालक पुरस्कार,विकासरत्न स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले सामाजिक पुरस्कार त्याचबरोबर शिवेंद्रसिंहराजे भोसले आदर्श ग्रंथालय पुरस्कार त्यांनी आत्तापर्यंत आपल्या या ग्रंथालयाला प्राप्त केले आहेत.
सामाजिक कार्यात सतत हिरीरीने सहभाग घेणारे संदीप परामणे यांनी भाजपच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला देखील सक्षमपणे सुरुवात केली आहे. तालुक्याचे नेते वसंतराव मानकुमरे यांचे मानसपुत्र म्हणून त्यांची राजकारणात नव्याने ओळख निर्माण झाली आहे. भाजप मंडल अध्यक्ष कामकाज करीत असताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख असून पक्ष निष्ठेला ते प्राधान्य देतात. पक्षाने दिलेली जबाबदारी ते नेटाने पार पाडत असतात. अशा या समाजशील राजकीय नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

(शब्दांकन श्री. विकास धोंडे

धोंडेवाडी ता.जावळी)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button