सगळं ‘मलाच’ हवं म्हणणाऱ्यांना गटातील जनता मोठ्ठा धडा शिकवेल
एकनाथ ओंबळे यांचे विरोधकांवर टीकास्त्र
केळघर : वास्तवनामा वृत्तसेवा
जिल्हा बँक मलाच,जिल्हा परिषदेतही माझ्याच कुटूंबातील असं सगळं मलाच म्हणणाऱ्यांना या निवडणुकीत कुसूंबी जिल्हा परिषद गटातील जनताच मोठ्ठा धडा शिकवेल असे टीकास्त्र करीत या विभागातील बोंडारवाडी धरणासह , पर्यटन , कृषी व्यवसाय , महिला गृहउद्योग याला चालना देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या कडून काम होईल. त्यामुळे जनता नक्कीच माझ्या सारख्या समाजसेवकाच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी व्यक्त केला.
कुसुंबी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार कविताताई ओंबळे , आंबेघर पंचायत समितीचे गणाचे उमेदवार आतिष कदम यांच्या प्रचारार्थ केळघर परिसरातील कुरुळोशी , गाढवली , आंबेघर , डांगरेघर , पुनवडी , नांदगणे , वरोशी , बोंडारवाडी , भुतेघर , वाहिटे , बाहुळे , वाळंजवाडी , तळोशी , मुकवली , वाटंबे , गवडी , आसनी , ओखवडी , भोगवली आदि गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला . यावेळी ते बोलत होते .
यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सचिन शेलार, युवासेनेचे तालुका प्रमुख प्रसाद धनावडे , प्रशांत जुनघरे , विठ्ठल पाटणे , संतोष कदम,महादेव ओंबळे , बाळासाहेब ओंबळे , दिपक ओंबळे , वनिता ओंबळे , राजाराम जाधव आदि उपस्थित होते .
या गटात तरुणांचा उत्स्फूर्त पाठींबा शिवसेनेच्या उमेदवारांना मिळत असून या विभागातील निष्ठावंत शिवसैनिक येथील स्वाभिमानी जनतेच्या पाठींब्याने गटावर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असे प्रतिपादन पंचायत समितीचे उमेदवार अतिष कदम यांनी प्रचारादरम्यान केले.
यावेळी गावा -गावातील मतदारांशी उमेदवारांनी संपर्क साधत पक्षाची भूमिका समजावून सांगत धनुष्य बाणाला मतदान करण्याचे आवाहन केले .
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे . शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ ओंबळे हे कोणताही पक्ष न बघता केवळ समाज हितासाठी काम करत आले आहेत . त्यामुळे जनता नक्कीच शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी राहिल .
कविताताईओंबळे उमेदवार कुसूंबी गट (शिवसेना)



