क्राईम

मोहरम निमित्ताने सातारा तालुका पोलिसांकडुन रूट मार्च

सातारा : वास्तवनामा वृत्तसेवा

   मोहरम सणानिमित्ताने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गजवडी, कोंडवे, नेले यासह इतर गावांमध्ये सातारा तालुका पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत हा रूट मार्च काढण्यात आला.

सदर रूट मार्च वेळी संबंधित गावांमधील सरपंच, पोलीस पाटील,शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.
या रूटमार्चमध्ये पाच पोलीस अधिकारी, ३५ पोलीस अंमलदार, ३९ होमगार्ड यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

“मोहरम सणानिमित्त तालुक्यातील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांकडून हा रूट मार्च काढण्यात आला.
निलेश तांबे
पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button