राजकीय

मी तुमच्याच ‘मातीतील’,तुमचीच लाडकी ‘सून’

म्हसवे गणातील प्रचारादरम्यान राष्ट्रवादी उमेदवार शिल्पा शिंदेंची मतदारांना भावनिक साद

हुमगाव : वास्तवनामा वृत्तसेवा

मी तुमच्याच मातीतील व तुमचीच लाडकी सून असून म्हसवे गणातून निवडणुकीसाठी उभी असून तुमच्या या सुनेला आपले बहुमूल्ये मतदान देऊन प्रेम द्या असे भावनिक आवाहन सौ.शिल्पा शिंदे यांनी मतदारांना केले.त्या इंदवली येथे प्रचारादरम्यान बोलत होत्या.

यावेळी ऋषिकांत शिंदे,माजी सभापती मोहनराव शिंदे, जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संदीप पवार, डॉक्टर मिलिंद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान यावेळी मोहनराव शिंदे म्हणाले इंदवली, आखाडे,वालूथ, सोमर्डी, कोलेवाडी, जरेवाडी ,या हुमगावच्या आसपास गावांमधील जनतेने हुमगांवकरांवर भरपूर प्रेम केले आहे.या प्रेमातून आम्ही हुमगावकर मंडळी उतराई होऊ शकत नाही.या गावांसह या गणातील सर्व गावे जेव्हा जेव्हा हुमगावातील उमेदवार निवडणुकीत उभा असेल तेव्हा,तेव्हा पक्ष व्यक्ती न पाहता त्याच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहेत.या निवडणुकीतही गणातील सर्व गावांचे असेच प्रेम शिल्पा शिंदे यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन माजी सभापती मोहनराव शिंदे यांनी यावेळी केले.

म्हसवे गावापासून सुरू झालेली ही प्रचार रॅली कोलेवाडी, जरेवाडी, वाळूथ, आखाडे,इंदवली, करंदी, रानगेघर पर्यंत काढण्यात आली. यावेळी शिल्पा शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधत विशेषतः महिला वर्गाशी आपुलकीने संवाद साधत त्यांची मने जिंकली.त्यामुळे अबालवृद्ध महिला ही इथे बोलू लागल्या की
रामकृष्ण हरी.!
वाजवा तुतारी..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button