सामाजिक
जावली बँकेचे माजी चेअरमन चंद्रकांत गावडे यांना पितृशोक

करहर : वास्तवनामा वृत्तसेवा
जावली तालुक्यातील टोम्पेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक कै. रावसाहेब आबाजी गावडे-पाटील यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन.कै.रावसाहेब गावडे-पाटील हे जावली बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक चंद्रकांत गावडे यांचे वडील असून,त्यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात तालुक्यात उल्लेखनीय काम आहे.त्यांच्या निधनाने करहर परिसरात हळ-हळ व्यक्त होत आहे.२७ एप्रिल रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी कै. रावसाहेब गावडे-पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून, अंत्यविधी आज मंगळवारी दुपारी चार वाजता टोम्पेवाडी ता जावळी येथे होणार आहे.



