विरोधी उमेदवार आत्तापर्यंत होते कुठे,,, निवडणूक आली की फक्त दिसतात आता मतदारच लागले बोलायला कमळावरच शिक्का

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा
कोण म्हणतं सगळं यांनाच पाहिजे,,,, ते मागत नाहीत आम्हीच त्यांना स्वतःहून देतो आहोत,,, आमच्या वेळेकाळेला,अडचणीला धावून कोण येतं ? आम्ही कोणाकडे मदतीसाठी जातो ? त्यांच्या आजोबांपासून ते सौरभ बाबांपर्यंत सर्वांनीच कुडाळचा विकास केला आहे विरोधी उमेदवारांनी काय दिवे लावले ते त्यांना मतदान करायचे असा थेट सवाल कुडाळ गणातील मतदार विचारत आहेत सौरभ बाबांच्या पाठीमागे भाजपाची भक्कम ताकद आहे नामदार शिवेंद्रसिंहराजेंची साथ आणि शक्ती आहे मग आम्ही कोणाला मतदान करणार त्यांनाच ना ? आता निर्धार पक्का सात तारखेला फक्त कमळावर शिक्का कुडाळ पंचायत समितीला सौरभबाबा शिंदे यांनाच प्रचंड मतांनी आम्ही विजयी करणार असल्याचा निर्धार कुडाळ गणातील मतदारांनी केला असल्याचे दिसून येत आहे
जावली तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचार ऐन रंगात आला असून भाजपाच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे कुडाळ गणातील भाजप उमेदवार आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांच्या विजयासाठी कुडाळ गणातील जनताच रस्त्यावर उतरली आहे सगळी पदे यांनाच पाहिजे असा प्रचार विरोधक करत असले तरी मतदार मात्र सौरभ बाबांच्या बरोबरच असल्याचे बोलत आहेत सौरभ बाबांसारखं तरुण आणि उमद नेतृत्वच आमचा विकास करू शकते सौरभ बाबांच्या पाठीमागे घराण्याचा वारसा आहे राजकारणात बाबांच्या रूपाने तिसरी पिढी काम करत आहे आणि स्वतः सौरभ बाबा सर्वांना मिळून मिसळून घेऊन काम करत आहेत हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे
विरोधकांना निवडून देऊन आमचा काय फायदा केंद्रात सत्ता भाजपाची,,,राज्यात सत्ता भाजपाची,,, जावलीत सत्ता भाजपाची मग विरोधी उमेदवार निवडून देऊन आमचा काय विकास होणार यासाठी आम्ही निर्धार केला आहे आमच्या सौरभ बाबांना विजयी करून पंचायत समितीच्या सभापती पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्याचा,,,,



