राजकीय
कविता ओंबळे यांची शिक्षण व क्रीडा समिती सदस्य पदी निवड

सातारा : वास्तवनामा वृत्तसेवा
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समिती सदस्यपदी जवळी तालुक्यातील कुसुंबी गटातून मताधिक्याने निवडून आलेल्या शिवसेनेच्या सदस्या सौ.कविता एकनाथ ओंबळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
जावळीतील कुसुंबी जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे गट)पक्षातून कविता ओंबळे यांनी आपला विजय संपादित केला असून शिवसेनेच्या एक आक्रमक जिल्हा परिषद सदस्या म्हणून त्यांनी महिनाभरात आपली ओळख सातारा जिल्हा परिषदेत केली आहे.१७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत कविता ओंबळे यांची शिक्षण व क्रीडा समिती सदस्यपदी निवड करण्यात आली असलेचे जाहीर करण्यात आले.
या निवडीबद्दल सौ ओंबळे यांचे पालकमंत्री शंभूराजे देसाई तसेच जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.



