शैक्षणिक

भाजपमुळे गायकवाड गुरुजींचे कर्तुत्वाला योग्य दिशा मिळेल : वसंतराव मानकुमरे

म्हसवे ग्रामस्थांकडून सुरेश गायकवाड गुरुजींचा भव्य नागरी सत्कार; ५२ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

कुडाळ :वास्तवनामा वृत्तसेवा

 शिक्षकी सेवेत काम करताना आदर्श विद्यार्थी घडवण्याचा ध्यास घेणारे सुरेश गायकवाड गुरुजी आज जरी सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांना भाजपच्या मधयामातून समाजाची सेवेत आम्ही घेत आहोत.शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करत सामाजिक बांधिलकी जपणारे सुरेश गायकवाड गुरुजी यांच्या कर्तृत्वाला भाजपमुळे योग्य दिशा मिळेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले.

म्हसवे येथे सुरेश गायकवाड गुरुजींच्या शैक्षणिक सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. शिक्षणासोबतच वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, ग्रामविकासासाठी एकजूट घडवणे आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे—या सर्व बाबींमुळे ग्रामस्थांनी कृतज्ञतेने हा सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ५२ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये स्वागत कमान (७ लाख), प्राथमिक शाळा रस्ता (२० लाख), अंगणवाडी इमारत (१२ लाख) आणि सोसायटी इमारत (१३ लाख) या कामांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला माजी आमदार सदाशिव सपकाळ, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे,बाजार समितीचे चेअरमन जयदीप शिंदे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, भाजप मंडलअध्यक्ष संदीप परामणे, माजी सभापती अरुणा शिर्के, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके, शिक्षक संघ अध्यक्ष तानाजीराव आगुंडे, मच्छिंद्र मुळीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गायकवाड गुरुजींच्या कर्तृत्वाची दखल घेत ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी या कार्यक्रमात भाजप जावली तालुका प्रवक्तेपदी गुरुजींची नियुक्ती करत नियुक्तीपत्र प्रदान केले. तसेच शिक्षक संघातील त्यांच्या योगदानाचा गौरव करत सिद्धेश्वर पुस्तके यांनी राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती जाहीर केली.

माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी गायकवाड गुरुजींनी शिक्षकांच्या हक्कांसाठी परखडपणे भूमिका घेत सहकाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याचे नमूद केले. “अधिकाऱ्यांकडून अडचणी निर्माण झाल्यास गुरुजींनी निर्भीडपणे प्रश्न मांडले—हे योगदान अमूल्य आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी म्हसवे वडाच्या वनराईला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी आणि आवश्यक सुविधा उभारण्यासाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. माजी सरपंच अजय शिर्के यांनी गावातील आजवरच्या विकास कामांचा आढावा घेत पुढील अपेक्षित कामांची मागणी मांडली.

सत्काराला उत्तर देताना सुरेश गायकवाड गुरुजी म्हणाले, “ग्रामस्थांनी केलेला हा सन्मान अविस्मरणीय आहे. उरलेले आयुष्य गावच्या प्रगतीसाठी समर्पित राहील. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे निष्ठेने काम करेन.” यावेळी त्यांनी म्हसवे गणातून अरुणा शिर्के यांना उमेदवारी देण्याची अपेक्षा टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली.

कार्यक्रमात मुंबईकर व म्हसवे ग्रामस्थांच्या वतीने मानचिन्ह देऊन गुरुजींचा नागरी सत्कार करण्यात आला. विठ्ठल विष्णू शिर्के, आनंदराव गायकवाड, सुभाष शिर्के, तुळशीदास शिर्के, अंकुश शिर्के, अनिल शिर्के, चार्टर्ड अकाउंटंट जयसिंग चव्हाण, योगेश सावंत, सोसायटी चेअरमन मानसिंग गोडसे, माजी सरपंच शैला शिर्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button