शैक्षणिक

निष्ठा व सुसंस्कृतपणा शिक्षक संघातच पहायला मिळतो

नूतन तालुकाध्यक्ष तानाजी आगुंडे : शिक्षक संघाची कार्यकारणी जाहीर

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा

   प्राथमिक शिक्षक संघ हा राज्यात शिक्षकांची मजबूत संघटना म्हणून ओळखला जातो.अशा या संघटनेचे अध्यक्ष पद भूषवत असताना अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन या पुढील काळातजुन्या नव्यांना सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून, प्रामाणिक निष्ठा व सुसंस्कृतपणा फक्त शिक्षक संघातच पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन जावळी तालुका नूतन अध्यक्ष तानाजी आगुंडे यांनी केले.

शिक्षक संघाच्या  मेढा येथे आयोजित केलेल्या महामेळावा प्रसंगी आगुंडे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिक्षक संघ माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक,सुरेश जेधे, नेते मिलन मुळे, विनायक चोरट,संजय धनावडे, शंकर जांभळे, भा.र. भोसले, आर टी दळवी, शिक्षक बँक संचालक विजय शिर्के, महाबळेश्वर संचालक संजय सपकाळ,गणेश कदम, अशोक भिलारे, बळवंत पाडळे, शंकर बिरामणे, माजी संचालक गणेश तोडकर, महिला अध्यक्षा शैलजा धनावडे, शशिकला शिंगटे,शोभा धनावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आगुंडे म्हणाले यापूर्वी पंधरा वर्षे मी शिक्षक समितीत काम केले मात्र प्रत्येक निवडणुकीत समितीतील झारीतील शुक्राचार्यांमुळे नेतृत्व करताना समितीत काम करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळेच अखेर समितीला राम राम करण्याचे ठरवून संघात प्रवेश केला. तालुक्यातील संघ नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्षपद दिले त्या पदाला साजेसे काम करताना संघटना वाढवण्यावर माझा भर राहील.

यावेळी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष मुळीक म्हणाले संघटना तालुक्यातशिक्षकांच्या पाठीशी ठाम उभी राहून एकसंघपणे काम करीत आली आहे. त्यामुळे तालुक्यात महिला शिक्षिका सुरक्षितपणे आपली सेवा बजावत आहेत. असेच संघटन एक संघपणे ठेवत तालुक्यातील सर्व शिक्षकांनी काम करावे केवळ बँके निवडणुकीपूरते संघटनेकडे न पाहता शिक्षकांच्या प्रश्नांकडे देखील तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. नूतन कार्यकारणी कटाक्षाने संघाच्या ध्येय धोरणांप्रमाणे काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी अध्यक्ष आर टी दळवी म्हणाले संघटनेत काम करताना अनेक अनुभव आले. शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कामकाजापुरते एकसंघ न राहता शिक्षकांच्या सुखदुःखात देखील सहभागी होऊन प्रत्येकाला आधार दिला पाहिजे. असे मत दळवी यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी नूतन तालुका अध्यक्षपदी बामणोली विभागाचे शिक्षक नेते तानाजी आगुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर नेतेपदी संजय धनावडे,कार्याध्यक्षपदी जालिंदर सुतार, कोषाध्यक्षपदी दत्ता चिकणे,सरचिटणीसपदी संदीप किर्वे यांच्यासह नूतन तालुका कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली.

यावेळी निलेश उत्तेकर,पी व्ही धनावडे,पी टी कदम,विनायक करंजेकर,आंनदा शेलार,अंकुश शिंदे,सुनील माने यासह शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते,सूत्रसंचालन अशोक लकडे यांनी तर आभार शँकर जांभळे यांनी मानले.

दरम्यान या महामेळावा प्रसंगी तानाजीराव आगुंडे यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुक्यातील जवळपास ४० ते ५० शिक्षकांनी शिक्षक समितीचा राजीनामा देत शिक्षक संघात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button