राजकीय

साताऱ्यातील जनआक्रोश मोर्चात जावळीच्या रणरागिणी आक्रमक

सातारा : वास्तवनामा वृत्तसेवा

  संसदेत मांडण्यात आलेल्या नारीशक्ती वंदन (महिला
आरक्षण) विधेयकास विरोध करणाऱ्यांचा साताऱ्यात भाजप महिला मोर्चाचा वतीने जनआक्रोश मोर्चाद्वारे निषेध करण्यात आला. या मोर्चामध्ये तालुक्यातील महिलांची आक्रमकता दिसून आली.

शिवतीर्थ येथून सुरू झालेला हा जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी व समर्थक सहभागी झाले होते. हातात फलक, घोषणाबाजी आणि महिलांच्या हक्कासाठी आक्रमक महिलांनी हा मोर्चा लक्षवेधी ठरला. विरोधकांच्या विधेयक विरोधी भमिकेचा तीब्र निषेध नोंदवण्यात आला.

जावळी तालुक्याचे भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे आणि महिला तालुकाध्यक्ष मीनाक्षी बेलोशी यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुक्यातील भाजप महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या रणरागिणींनी महिलांच्या आरक्षणासाठी ठाम भूमिका घेत काँग्रेसह विरोधी पक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जावळी
तालुक्यातील महिलांची संघटित ताकद आणि आक्रमकता या मोर्चाचे प्रमुख आकर्षण ठरली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button