सहकार

वीस हजार शेअर्स तर दोन लाख ठेव निवडणुक लढणवऱ्यास  अनिवार्य

जावळी सहकारी बँकेच्या ५३ व्या वार्षिक सभेत सर्वानुमते ठराव मंजूर ; सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

मुबंई : वास्तवनामा वृत्तसेवा
स्पर्धेचे युग असताना देखील जावळी सहकारी बँकेने १७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. बँकेची अशीच आर्थिक प्रगती व्हावी यादृष्टीने जावळी सहकारी बँकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास आता वीस हजार शेअर्स तर दोन लाख ठेव ठेवणे बंधनकारक राहणार असा ठराव जावळी सहकारी बँकेच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला. या ठरावामुळे बँकेची आर्थिक प्रगती उंचावण्यास मदतच होणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे यांनी केले.

हभप दत्तात्रेय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डिसिल्वा स्कूल दादर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आ. सदाशिव सपकाळ,बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे,जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे,अमित कदम, भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामणे,राष्ट्रवादी (अजित पवार गट)अध्यक्ष साधू चिकणे,बाजार समिती चेअरमन जयदीप शिंदे,सागर धनावडे, चेअरमन विक्रम भिलारे, व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी, संचालक चंद्रकांत गावडे, योगेश गोळे, विनोद कळंबे, संतोष कळंबे, बाळासाहेब भालेघरे,उद्योजक कमलेश भालेघरे,वसंत तरडे,उमिता रांजणे,जयश्री मानकुमरे,विश्वनाथ धनावडे,आनंदराव सपकाळ,भानुदास जाधव, हिंदुराव तरडे, तानाजी शिर्के आदी उपस्थित होते.

दरम्यान सभेत विषय पत्रिकेवरील विषय सर्वानुमते मान्य करण्यात आले. मात्र संचालक मंडळाने बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने किमान सहा महिने निवडणुकीपूर्वी ५० हजारांचे शेअर्स व पाच लाख रुपये बँकेत ठेव ठेव ठेवणे बंधनकारक राहील. हा ठराव प्रथम सभेसमोर आणला मात्र या ठरावास सभासदांनी कडाडून विरोध केला अखेर हा ठराव निवडणुकीपूर्वी दोन महिने मुदत देऊन २०हजारांचे शेअर्स,रुपयांचे व दोन लाख रुपये बँकेत ठेव इच्छुक उमेदवाराची असावी हे बंधनकारक राहणार असल्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. तसेच जावळी सहकारी बँकेच्या आतापर्यंत २४ शाखा कार्यरत आहेत. तर आता राज्याबाहेर शाखा विस्तार होणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने ठराव मांडण्यात आला. यामध्ये गोवा व मध्यप्रदेश राज्यात शाखा सुरू करण्याबाबतचा ठराव सर्वांनुमते संमत करण्यात आला. याबरोबरच विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांच्या समोर ठेवण्यात आले, व त्या विषयांना मंजुरी घेण्यात आली.

यावेळी जावळी सहकारी बँकेने चेअरमन विक्रम भिलारे व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्रात स्पर्धा असताना देखील मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत १७०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला. याबद्दल संचालक, कर्मचारी सभासदांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष आभार अभिनंदन केले.

 चेअरमन विक्रम  भिलारे यांची कौतुकास्पद कामगिरी

जावली सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन विक्रम भिलारे हे सर्व संचालकांना विश्वासात व सोबत घेऊन काम करीत असल्यामुळेच बँकेने १७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. योग्य नियोजन व बँकिंग व्यवस्थापनाचा आदर्श वस्तूपाठ जावली बँकेचे चेअरमन भिलारे यांच्या कामकाजातून पहायला मिळत असल्याचे गौरवोद्गार काढत माजी आ. सदाशिव सपकाळ यांनी भिलारे यांचे कौतुक केले.तर नव्या नियमावलीमुळे दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी होणाऱ्या संचालकांना आगामी निवडणूक लढवता येत नसली तरी देखील विक्रम भिलारे हेच जावली सहकारी बँकेचे मार्गदर्शक राहतील अशी ग्वाही मानकुमरे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button