प्रशासकीय

सोमर्डी ग्रामीण रुग्णालयासमोरील गटार स्वच्छतेच्या कामास प्रारंभ

नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्काळ कारवाई;

मेढा : वास्तवनामा वृत्तसेवा

   जावळी तालुक्यातील सोमर्डी येथील तालुका ग्रामीण रुग्णालयासमोरील गटार अनेक दिवसांपासून तुंबल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव तसेच विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला होता. ग्रामीण रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ये-जा होत असल्याने परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

या गंभीर प्रश्नाची भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संदीप परामणे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून तातडीने दखल घेण्याची मागणी केली. त्यानंतर नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने कारवाई करत गटार स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामाबद्दल ग्रामस्थांनी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, उपअभियंता दिनेश पवार,शाखा अभियंता अटकेकर यांचे आभार मानले.

यावेळी माजी उपसभापती रवींद्र परामणे, माजी सरपंच संतोष शेलार, रमेश परामणे, सतीश परामणे, मनोज परामणे, भीमराव दरेकर, तात्या कांबळे, संतोष परामणे आदी उपस्थित होते.

बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाच्या कार्यतत्पर अधिकाऱ्यांनी या कामास प्रत्यक्षात  सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थ सोमर्डी यांच्या वतीने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष आभार.

संदीप परामणे

मंडल अध्यक्ष भाजप जावळी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button