प्रशासकीय

कोयनेतील  लाँचेसच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी निधी

मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून निधीची तरतुद

महाबळेश्वर :वास्तवनामा वृत्तसेवा
    कोयना जलाशयाच्या पाणीसाठ्यामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या दळणवळण व संपर्कासाठी शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्या तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील जलवाहतुकीसाठी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी, तसेच बार्च, लॉन्चेसच्या इंधन व देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी आॅक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी ३५ लाख ५३ हजार ३१० रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी मदत व पुनवर्सनमंत्री मकरंद पाटील यांनी प्रयत्न केले होते. या निर्णयामुळे कोयना जलाशयाच्या परिसरातील लोकांना समाधान व्यक्त केले.
 कोयना जलाशयाच्या पाणीसाठ्यामुळे बाधित झालेल्या गावांतील नागरिकांच्या दळणवळण व संपर्कासाठी १९७६-७७ पासून तापोळा (ता. महाबळेश्वर) परिसरात जलवाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. हा तराफा केळघर तर्फ सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोट्या- मोठ्या वाहनांची पाण्यातून वाहतूक करत असतो. त्यामुळे कोयना जलाशयावरील साताऱ्यातील दुर्गम व डोंगराळ भागात दळणवळणाचा कणा म्हणून तराफा वाहतूक समजली जाते. हा भाग दुर्गम असून, पर्यटक आपली वाहने ताराफ्यातून घेऊन जात असतात. स्थानिक साताऱ्याला जा- ये करण्यासाठी आपली वाहने घेऊन जातात.
तापोळा येथील जलवाहतुकीसाठी सध्या कार्यरत असलेल्या १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी घेणे व त्यांच्या वेतन व भत्त्यासाठी मदत व पुनर्वसन विभागामार्फत अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून सहायक अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ व ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील देय वेतन, भत्ते व मानधन अदा करण्यासाठी, तसेच इंधन व देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी ३५ लाख ५३ हजार ३१० रुपयांचा निधी पुणे विभागीय आयुक्तांकडे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या निर्णयामुळे कोयनेच्या खोऱ्यातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button