पोलीस निरीक्षक तांबे यांनी कुटुंबीयांसमवेत एहसास बालगृहात साजरी केली दिवाळी
कायदा सांभाळणारे अधिकारी तांबे यावेळी झाले भावनाविवश

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा
दिवाळी हा प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण करणारा सण आहे. लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनाच दिवाळी सणाचे आकर्षण राहते. प्रत्येक घरात आनंदाचा, उजेडाचा आणि गोडधोडाचा सण.पण काहीच्या आयुष्यात दिव्यांचा प्रकाश पोहोचतच नाही. अशा मुलांसमवेत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत व सहकाऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली. व या मुलांच्या डोळ्यांतील निःशब्द
दिवाळी यंदा उजळवली ती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी.

सातारा तालुक्यातील वळसे येथील एहसास मतीमंद बालगृह याठिकाणी आपल्या कुटुंबियासमवेत व सकार्यसमवेत दिवाळी पाडवा साजरा केला.यावेळी या विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ,अन्नधान्य तसेच मिष्ठांन भोजनदेखील दिले.दिवाळीच्या या
दिवसांत सर्वजण आनंदात हा सण साजरा करीत असताना तांबे कुटूंबियांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासल्याने एक कठोर शिस्तीचे, धैर्यवान पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्यातील एक संवेदनशील माणूस देखील दिसून आला.

एक पोलीस अधिकारी नव्हे तर ते यावेळी या मतिमंद मुलांना आपले काकाच वाटले.यावेळी तांबे कुटूंबियासमवेत सातारा तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शंकर माने, पोलीस हवालदार धनंजय कुंभार, धोंडीराम हंकारे, मनोज गायकवाड, प्रदीप मोहिते, पोलीस शिपाई प्रसाद शिंदे आदी उपस्थित होते.



