पाचगणी पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट सायबर प्रकटीकरण पुरस्कार

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा
पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सायबर गुन्हे प्रकटीकरण कामकाजात उत्कृष्ट कामगिरी केल्याने पाचगणी पोलीस स्टेशनचा सर्वोत्कृष्ट सायबर प्रकटीकरण पुरस्कार जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बुधवारी सातारा पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून पाचगणी पोलीस स्टेशनचा कारभार उत्कृष्टरित्या सांभाळला आहे. गुन्ह्यांचे अत्यल्प प्रमाण असताना देखील सपोनि पवार यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यावर अधिक भर दिला आहे.

त्यांच्या सायबर गुन्हे प्रकटीकरणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस स्टेशनला सर्वोत्कृस्ट सायबर प्रकटीकरण पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार सपोनि दिलीप पवार तसेच त्यांच्यासमवेत पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे अमोल जगताप, महिला पोलीस अंमलदार रेखा तांबे यांनी स्वीकारला.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर ,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.



