रानडुकराची शिकार करणा-या आरोपीवर सातारा वनविभागाची कारवाई

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा
भरतगाववाडी ता.जि. सातारा येथील स्थानिक नाव म्हसोबा या ठिकाणी विजेच्या तारेच्या धक्याने (करंट) वन्यप्राणी रानड्क्कराची अवैधरित्या
शिकार झालेचे गुप्त माहिती समजले वरून तात्काळ घटनास्थळी सातारा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली असता, मृत वन्यप्राणी रानड़क्कर-एक नर, शिकारीसाठी वापरण्यात आलेले औजारे आढळून आले.
वयाप्रकरणी पंकज गणपत घोरपडे वय ४० वर्ष रा.भरतगाववा्डी ता.जि.सातारा, महेश मारुती पडवळ वय २६ वर्ष रा. भरतगाववाडी ता.जि.सातारा यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा नॉंदवून कारवाई करण्यात आली.घटनास्थळावरून मृत वन्यप्राणी रानडुक्कर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) सातारा अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रॉधळ यांचे सखोल मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, सुनील शिंदे वनपाल सातारा, अभिजीत कुंभार वनरक्षक भरतगाव,मुकेश राऊळकर वनरक्षक
सातारा,सुहास काकडे वनरक्षक परळी, संतोष दळवी वाहन चालक व इतर कर्मचारी यांनी केली.
वन्यप्राण्यांची शिकार करताना कोणी निदर्शनास आलेस महाराष्ट्र वन विभागाच्या टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क साधावा किंवा नजीकच्या वनक्षेत्रपाल कार्यालयास तात्काळ माहिती देण्यात यावी. मानव वन्यजीव संघर्ष बाबतीत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जसे सोलर कुंपण योजनेचा लाभ घ्यावा. पिक नुकसानी झालेस त्वरीत माहिती देण्यात यावी.असे आवाहन वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी केले आहे.



