प्रशासकीय

जावळी तालुक्यात बांधकामकडून “खड्डेमुक्त रस्ता” मोहीम हाती

बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या आदेशाने कुडाळ-पाचगणी-मेढा रस्त्यावरील सर्व खड्डे मुजवण्याचे काम सुरू

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा
     पाचवड-कुडाळ,पाचगणी-मेढा या मुख्य राज्यमार्गावर खड्डे पडल्याने हे खड्डे गणेशोत्सव पूर्वी मुजवण्यात यावे यासाठी भाजप मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार बांधकाम विभागाकडून आज तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली.

तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे अनेक रस्त्यांना नव्याने डांबरीकरण केलेले असतानाही खड्डे पडतात.तालुक्यातील नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी हे खड्डे भरले जावेत अशी मागणी होत होती.या मागणीचा विचार करता मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागास खड्डे मुक्त रस्ते करण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार बांधकाम विभागाचे उपअभियंता दिनेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता आटकेकर,कोन्हाळकर यांनी आज शुक्रवारी तालुक्यातील कुडाळ- पाचगणी,कुडाळ-मेढा या मुख्य राज्यमार्गावरील साईड-पट्टी तसेच खड्डे मुजवण्याच्या कामास सुरुवात केली.

जावळीत ‘खड्डामुक्त रस्ता’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जावळी तालुका भाजप कार्यालयातून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.त्यानुसार बांधकाम मंत्र्यांनी जावळी बांधकाम विभागास सूचना केल्याने तालुक्यात आज हे काम सुरू करण्यात आले आहे.खड्डामुक्त रस्ता मोहिमेचे जावळी तालुक्यातील नागरिकांकडून स्वागत होत असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष आभार जावळीकरांनी मानले.
संदीप परामणे
भाजप मंडलअध्यक्ष(जावली)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button