जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर
मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये काही खुशी कभी गम

- मेढा/ वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आज सरपंच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली .तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील अनेक मोठ्याव राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी इच्छुक असणाऱ्या मंडळींची आरक्षणामुळे निराशा झाली आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये काही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेली सायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे .तर बिभवी ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, यासह १६, ग्रामपंचायत मध्ये हे आरक्षण पडले आहे.

सर्वसाधारण महिलाराखीव प्रवर्गासाठी रायगाव,महामुलकरवाडी,मोरघर,ओझरे,कुसुम्बि,सरताळे, अशा ३९ ग्रामपंचायतींमध्ये हे आरक्षण पडले आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी खर्शी-बारामुरे ,करहर, सोमर्डी, हुमगाव, कुडाळ, सर्जापूर ,सोनगाव, आनेवाडी, दरेखुर्द,यासह ४० ग्रामपंचायतींचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे .
ही संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.



