राजकीय
भाजप कार्यालयाचे कुडाळ येथे आज उदघाटन
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार उदघाटन

कुडाळ / वास्तव नामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील कुडाळ येथे भारतीय जनता पार्टीचे पक्ष कार्यालयाचे आज रविवारी सकाळी ९ वा.समर्थ फर्निचर शेजारी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांच्या उपस्थिती उद्घाटन होणार आहे. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सरपंच,पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांनी केले आहे.
तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी तसेच पक्षाचा विस्तारासाठी संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.तरी तालुक्यातील नागरिकांनी यापुढे या कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन संदीप परामणे यांनी केले आहे.



