वेण्णा-निरंजनाचे बँकेत रूपांतर व्हावे आ.शशिकांत शिंदे
वेण्णा निरंजनाची पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुबंई येथे संपन्न

मुबंई /वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील मुंबई स्थित कष्टकऱ्यांची वेदना निरंजना पतसंस्था पतसंस्थेचे कामकाज आदर्श व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे आहे त्यामुळे या पतसंस्थेची लवकरच बँकेत रुपांतर व्हावे असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले वेण्णा निरंजना पतसंस्थेची सदस्य असावी वार्षिक सर्वसाधारण सभा न्यु बॉम्बे कल्चरल हॉल, कोपर खैरणे येथे बहुसंख्य सभासदांच्या उपस्थिती मध्ये पार पडली.
यावेळी सभेला संस्थेचे चेअरमन रवींद्र मोहिते,नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विष्णु धनावडे, अभयलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आनंदराव सपकाळ,एकनाथजी ओंबळे , जावली बँकेचे संचालक विश्वनाथ धनावडे,तारगाव सरपंच बबन डिगे,माजी संचालक महेश डिगे,नवयुग पतसंस्थेचे चेअरमन – विलासराव दळवी, जगदीश चार्टर्ड अकाउंटट विनोद चिकणे, संदेश शिंदे,तुकाराम दळवी, सरपंच – मारुती चिकणे, रामदास वेंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेची सुरुवातीला सागर जवळ यांनी आपल्या प्रास्ताविकामधुन संस्थेविषयी संक्षिप्त माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले.तद्नंतर उपाध्यक्ष रघुनाथ शेलार यांनी नफ्याची विभागणी सादर केली.सचिव प्रदीप वाघ, संचालक यदु चिकणे, जगन्नाथ बांदल, विनोद शिंगटे, सागर जवळ, अभयसिंह शिंदे, बाळासाहेब भोसले, राजेंद्र जाधव, दादु शेलार, संचालिका मिना जवळ ,स्वाती गाडगे यांनी अंदाजपत्रकातील विविध विषयांचे अहवाल वाचन केले. अहवालावर उपस्थित सभासदांनी प्रश्नांची विचारणा केली असता त्याविषयी संस्थेचे चेअरमन रविंद्र मोहिते यांनी यावेळी समाधानकारक उत्तरे दिली.
सभेत संस्थेला अहवाल वर्षात नफ्यात आणल्याबद्दल सर्वांनी कर्मचारी व संचालकांचे विषेश अभिनंदन केले.सभेस बबन बेलोशे, शाम जवळ, आनंदा सपकाळ ,शामराव गोळे, शंकर चिकणे,वैभव सपकाळ, संतोष शिंगटे, नामदेव बांदल, यशवंत जाधव, विजयकुमार लकडे, भरत धनावडे,दत्तात्रय धनावडे, नवीन मर्ढेकर,सूर्यकांत जवळ, आदी उपस्थित होते.विनोद शिंगटे यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.



