
कुडाळ /वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील सहकार क्षेत्राला प्रेरणादायी ठरावी अशी कामगिरी करत सरताळे विकास सेवा सोसायटीने सलग ३ वर्ष १०० टक्के कर्जवसुली साध्य केली आहे. ही तालुक्यातील पहिली संस्था ठरली आहे, जिला संस्था पातळीवर अशी शंभर टक्के वसुलीची कामगिरी करण्याचा मान मिळाला आहे.
या गौरवप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. दस्तगीर शेख, उपाध्यक्ष श्री. सुनील भिसे, संचालक श्री. राजेंद्र पवार, सोमनाथ पवार. सलीम शेख तसेच संपूर्ण संचालक मंडळ, कर्जदार सभासद, व सचिव मनोज देशमाने यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँक संचालक ज्ञानदेव रांजणे , व तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक श्री. सुनील जगताप या सर्वांनी संस्थेच्या पारदर्शक व कार्यक्षम कारभाराचे कौतुक केले.
विभागीय विकास अधिकारी राजेद्र निकम , विकास अधिकारी दीपकपार्टे, वसुली अधिकारी निकम, बेलावडे सोसायटीचे सचिव अनिल ससाणे, शाखा प्रमुख सागर गुरव .शुभांगी मानकुमरे तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील प्रामाणिक योगदानाची पावती देत, सरताळे विकास सेवा सोसायटीच्या या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला. अशा प्रकारच्या शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्था ग्रामीण भागात शाश्वत आर्थिक सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण ठरत आहेत.



