सहकार

जावली बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवून देणार :-चेअरमन विक्रम भिलारे

जावली बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे संपन्न

मुबंई /वास्तवनामा वृत्तसेवा

    दत्तात्रय महाराज कळंबे यांनी जावली तालुक्यातील मुंबईस्थित माथाडी कामगार व कष्टकरी जनतेसाठी स्थापन केलेल्या डी एम के जावली सहकारी बँकेने दहा कोटी नफा मिळवत बँकेची यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. दरम्यान जावली बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही जावली बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे यांनी दिली.

डी एम के जावली सहकारी बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे, बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे, आमदार शशिकांत शिंदे सदाशिव सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .यावेळी व्यासपीठावर बँकेचे व्हॉइस चेअरमन चंद्रकांत दळवी, राष्ट्रवादी अध्यक्ष साधू चिकणे,ज्येष्ठ संचालक हिंदुराव तरडे ,शालिनी बँकेचे अध्यक्ष भानुदास जाधव ,आनंदराव सपकाळ,संचालक प्रकाश मस्कर, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप परामणे, प्रशांत तरडे,जयदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

(दादर) मुंबई येथे नुकतीच हीसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्यावेळी भिलारे बोलत होते. बँकेकडून दिली जाणारी कर्जही भक्कम तारण घेऊनच दिली जात आहेत. त्यामुळे यापुढे बँकेचा एक रुपयाही कर्जदार बुडवू शकणार नाही. अशी प्रशासकीय व्यवस्था संचालक मंडळाने निर्माण केली आहे. भविष्यात एक हजार कोटींचा टप्पा पार करण्याचे बँकेचे उद्दिष्ट असल्याचा विश्वासही भिलारे यांनी यावेळी व्यक्त केला यासाठी आम्हा सर्व संचालक मंडळास नेते मंडळींचे सहकार्य रहावे अशी विनंती त्यांनी बोलताना व्यक्त केली.

  आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत :मानकुमरे

यावेळी बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे म्हणाले आजच्या बँकिंग क्षेत्रात स्पर्धा, कसरत मोठी करावी लागत आहे. जावली बँकेसाठी ज्यांचे योगदान नाही ते बँकेवर बोलत आहेत. बँकेचे संचालक मंडळ विश्वासपूर्वक बँकेत काम करीत आहेत. त्यांच्या विश्वासावरच बँकेचे कामकाज योग्य रीतीने चालू असून आपण वॉचमनच्या ,मार्गदर्शकाच्या भुमिकेत आहोत.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले सर्व आव्हान पार करीत जावली बँकेच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा दहा कोटी रुपये नफा मिळवला आहे ही कौतुकास्पद बाब आहे. बँकेच्या कामकाजात आमच्याकडून हस्तक्षेप होणार नाही मात्र चुकीचं काही केलं तर सहनही करणार नाही .असा सज्जड इशाराही शिंदे यांनी संचालक मंडळाला दिला.

सभेच्या सुरुवातीला संचालक अजित कळंबे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. तर मागील सभेचे इतिवृत्तांत वाचन संचालक विश्वनाथ धनावडे यांनी केले तसेच बाळासाहेब भालेघरे यांनी अहवाल वाचन केले. तर ज्येष्ठ संचालक चंद्रकांत गावडे यांनी ताळेबंद सादर केला. नफा विभागणी प्रकाश मस्कर यांनी सादर केली. तर संचालक वसंत तरडे, गणेश भोसले उमिता रांजणे, विजय कदम, चंद्रकांत गवळी या संचालकांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. त्यास सभासदांनी एक मताने मंजुरी दिली.

वार्षिक सर्वसाधारण सभेला जावली, वाई, महाबळेश्वर सह मुंबईमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक योगेश गोळे यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले तर एकनाथ ओंबळे यांनी उपस्थित आमचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button