सामाजिक
हातगेघर येथील तुकाराम खंडू गोळे-पाटील यांचे निधन
भाजप माजी अध्यक्ष श्रीहरी गोळे यांना पितृशोक

करहर :वास्तवनामा वृत्तसेवा
हातगेघर ता जावळी येथील तुकाराम खंडू गोळे – पाटील. वय ८५ यांचे वृद्धापकाळाने निधन. भाजपाचे माजी जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांचे वडील होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी वनिता, मुलगा श्रीहरी तसेच सुनीता रांजणे व सुजाता धनावडे दोन मुली तसेच सून पौर्णिमा गोळे, नातवंडे असा परिवार आहे.
हातगेघर गावचे माजी सरपंच, सोसायटी सचिव तसेच १७ वर्षे हातगेघर गावचे पोलीस पाटील म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामं पाहिले. ऑरगॅनिक तसेच प्रयोगशील शेतकरी म्हणून नव्हलौकिक मिळवला होता. स्पष्टवक्ते, कडक स्वभाव आणि प्रचंड शिस्तप्रिय असलेले व्यक्तिमत्व होते. हातगेघर सहागांव पांचक्रोशी मध्ये तुकाराम पाटील या नावाने त्यांना ओळखले जाते.



