सामाजिक
उद्योजक कै.ज्ञानदेव चिकणे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण
कुसुंबी येथे हभप नवनाथ लिमन यांचा सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन

मेढा :वास्तवनामा वृत्तसेवा
जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील उद्योजक कै. ज्ञानदेव कुंडलिक चिकणे (आण्णा) यांचा आज शनिवारी १० वाजता प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने कुसुंबी येथे अनाथांचे नाथ माऊली आधार आश्रम (माळेगाव)नसरापूर येथील हभप नवनाथ महाराज लिमन यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

कै. ज्ञानदेवांना आण्णा हे उद्योजक म्हणून तालुक्यामध्ये ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज पुण्यस्मरण निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चिकणे परिवार, साई आदर्श मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ कुसुंबी यांनी केले आहे.



