बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणारे उद्योजक : दत्ता शेठ भालेघरे
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त....

विद्यार्थीदशेत असताना गणितात कच्चे असणाऱ्या दत्ता शेठ भालेघरे यांनी पुढे जाऊन आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरीत अनेक बेरोजगार युवकांना माथाडी मध्ये रोजगार देऊन त्यांच्या आयुष्याच गणित बदलवलं त्यांच्या हाताला काम देऊन संसार उभे केले व कोलेवाडी सारख्या छोट्याशा गावातील हा तरुण मुबंई मध्ये उद्योजक म्हणून ओळखू लागला.अशा जावळी तालुक्यातील कोलेवाडी गावातील ट्रक ड्रायव्हर ते उद्योजक अशी भरारी मारणाऱ्या दत्ताशेठ भालेघरे यांच्या वाढदिवसानिमित्त …!!
जावळी तालुक्यातील कोलेवाडी हे छोटेसे गाव अशा छोट्या गावात प्राथमिक शाळेपासून शालेय शिक्षणास सुरुवात केलेल्या दत्ता भालेघरे यांनी पुढे हुमगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यास प्रवेश केला. यावेळी दहावीत असताना गणिताचा तास सुरू झाला सर वर्गात आली की दत्ता आप्पांनी वर्गातून बाहेर जायचं, कारणही तसं सरांनी सांगितलेलं. तू माझ्या तासाला बसायचं नाही नेमकं तेच कारण झालं दहावीत आप्पांच गणित बिघडलं. पुढे बारावी कशीबशी करताना गावातील ट्रकवर दत्ता भालेघरे यांनी आपल्या अर्थार्जनाची सुरुवात केली. क्लिनर नंतर ड्रायव्हर झालेल्या दोन-चार तरुणांपैकी दत्ता भालेघरे हे गावातील एक तरुण मात्र अशा परिस्थितीतही दत्ता भालेघरे स्वस्त बसले नाहीत. पुढे त्यांनी एअरपोर्टवर आपली स्वतःची एक कार घेऊन ती एअरपोर्टवर लावली. एकाच्या दोन गाड्या झाल्या एक ड्रायव्हर सोबतीला घेऊन ते स्वतः रात्रंदिवस मेहनत करत होते.

कष्ट करण्यासाठी यशाची दारे सदैव उघडी असतात. या म्हणीप्रमाणे मुंबईतील एका मित्राच्या सहकार्याने मुंबापुरीत ग्रोसरी बोर्डात दत्ता भालेघरे यांचा पहिला बॅच निघाला.व ते माथाडीत दाखल झाले, दिवसभर घाम गाळून रात्री दुसऱ्याची रिक्षा शिप वर ते चालवायचे.दिवसभर युनायटेड स्पिरिटच्या गोडाऊनमध्ये बॉक्स वाहणारा हा तरुण पुढे जाऊन उद्योजक होईल हे कोणाच्या मनातही आले नसेल, मात्र जिद्द चिकाटी आप्पांनी सोडली नाही. थोड्याच कालावधीत त्या टोळीचे ते मुकादम झाले. टोळीचे काम वाढवत हळूहळू संपूर्ण साकीनाक्यात काम करू लागले.
ग्राउंड लेव्हलला कामाचा गाडा अनुभव असल्याने आणि स्वतः रात्रंदिवस मेहनत करीत २०० ते २५० पेक्षा जास्त मोकळ्या हातांना काम देऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार दत्ता शेठ यांनी लावला. यातूनच त्यांचे तीनशे ते चारशे लोकांचे आज एक मोठं कुटुंब मुंबई नगरीत तयार झाले आहे. ही मंडळी संपूर्ण मुंबईमध्ये रात्रंदिवस घाम गाळून मोठमोठ्या कंपन्यांना उद्योजकांना सेवा देत आहेत. आपल्याकडे असणाऱ्या कामगारांसाठी त्यांच्या अडचणीला एक गाडी आणि एक ड्रायव्हर २४ तास सज्ज असतो. कामगार हा केवळ कामगार नसतो तर तो आपल्या कुटुंबातील एक सदस्य असतो, याप्रमाणे आप्पा आपल्या कामगारांना जपतात. अगदी कामगारांची कुठली अडचण असो ते रात्रंदिवस कामगारांच्या कुटुंबाच्या सेवेसाठी सज्ज असतात. छोट्या दुकानापासून ते इंडस्ट्री पर्यंत आज संपूर्ण महाराष्ट्रभर कष्ट रुपी सेवा देण्याचे आणि मोकळ्या हातांना काम देण्याचे काम दत्ता शेठ आज करत आहेत.
आप्पांची दिनचर्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असते. एवढे असूनही या माणसाची गावाकडची नाळ तितकीच घट्ट आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी आप्पा पहाटे गावी येतातच आणि एक दिवस गावाकडे येऊन आपल्या शेतात आपल्या मातीत ते रमतात. त्यामुळेच त्यांना मुंबईला माघारी गेल्यानंतर गावाकडची ही हवा, निसर्ग, गावातील प्रेमळ माणसांकडून मिळालेले प्रेम ही त्यांची “एनर्जी”वाढवते व त्यांना मुंबईत काम करण्यास मदत करते.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या दत्ता शेठ यांचे वडील गिरणी कामगार परंतु कापड गिरणी बंद पडल्यापासून ते गावाला शेती करतात,आपला मुलगा मोठ्ठा उद्योजक झाला असला तरीही ते आजही आपले पाय जमिनीवरच ठेवून शेतीच करतात. त्यांच्याकडे अजूनही स्वतःची बैलजोडी देखील असून स्वतःची जमीन ते स्वतः कसतात. मातोश्री सौ जनाबाई याही एक आदर्श माता,गृहिणी म्हणून वडिलांच्या सोबतीने त्यांना शेती कामात मदत करत असतात.
दत्ता शेठ यांच्या सर्व यशामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा व्यवसाय सांभाळण्यासाठी कर्तव्यदक्ष असणारे त्यांचे छोटे बंधू कमलेश यांनी आप्पांच्या सांगण्यावरून साताऱ्यातील मोठ्या इंजिनिअरिंग कँपनीतील मधील नोकरी सोडून आप्पा बरोबर मुंबईतील माथाडी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात स्वतः हमाली करत सर्व व्यवसायाचा डोलारा कमलेश यांनी सांभाळला .आजही कमलेश हे स्वतः शंभर ते दीडशे किलोमीटरचा प्रवास करून मुंबई व उपनगरामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतः मॅनेजमेंट सांभाळताना पाहायला मिळतात. आप्पांच्या पत्नी पूनमताई या उच्च शिक्षित असूनही आप्पाच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना तितक्याच ताकदीने साथ देतात.संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोठ्या धैर्याने त्या सांभाळतात.
भालेघरे कुटुंबीय एक सांप्रदायिक कुटुंब असून, पारायण ,भजन या कडे जास्त ओढा या कुटूंबाचा आहे. यामुळेच पाचवड- पाचगणी रस्त्याला त्यांनी अभिनव ऍग्रो फार्म उभे केले आहे. या फार्ममध्ये त्यांनी जवळपास ३७ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती उभारली आहे.गेली सात वर्षांपासून या ठिकाणी आषाढी एकादशीचा उत्सव हे कुटुंबीय मोठ्या उत्साहाने साजरा करत आले आहे. येणाऱ्या सर्व विठ्ठल भक्तांची मनोभावे सेवा करताना पाहायला मिळतात कोणताही गर्व नाही सर्वांशी विनम्रतेने वागणारे हे कुटुंबीय या सर्व कुटुंबांचा मुख्य आधारवड दत्ता शेठ भालेघरे हेच आहेत .त्यामुळे त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना यानिमित्ताने आप्पांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..



