राजकीय
सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार २० मार्चला
तर पंचायत समितींचे सभापती १६ मार्चला निवडले जाणार

सातारा : वास्तवनामा वृत्तसेवा
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृह सातारा येथे होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संबंधित तालुका पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६ मार्चला रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहेत.
त्याबाबत दिनांक आज ६ मार्च रोजी नोटिस काढून बजावणीसाठी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.



