राजकीय

दत्ता शेठ भालेघरे यांच्या एंट्रीने म्हसवे गटातील सर्वांचेच धाबे  दणाणले

वसंतराव मानकुमरे यांच्या मनात नेमकी कोणती खेळी सुरू

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा

    सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, आज रविवारी भाजप पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आणि चक्क या मुलाखतीला जावळी तालुक्यातील माथाडी नेते व उद्योजक दत्ता शेठ भालेघरे यांनी हजेरी लावत पक्ष निरीक्षकांना आपली मुलाखत दिली. दत्ता भालेघरे यांच्या एंट्रीने म्हसवे गटातील सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मात्र तरी देखील वसंत मानकुमरे  यांच्या मनात नेमकी कोणती खेळी सुरू आहे. हे दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.

अनेकांना राजकारणाची गोडी नसताना राजकारण नको नको म्हणणाऱ्या माणसांना वसंतराव मानकुमरे यांनी केवळ  आपले राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी राजकारणात आणले आहे, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत मुंबईमध्ये केवळ व्यावसाय सांभाळणारे दत्ताशेठ भालेघरे यांचा राजकीय जन्म मानकुमरे  यांनी आज घातलेला पाहायला मिळतो.

चक्क दत्ताशेठ भालेघरे आपल्या समर्थकांच्यासह लेक व्ह्यू हॉटेलला मुलाखतीसाठी हजर झाले. व चक्क त्यांनी म्हसवे जिल्हा परिषद गटासाठी मुलाखत दिली.म्हसवे जिल्हा परिषद गट हा  इतर मागासवर्गीय पुरुष गटासाठी राखीव आहे. अशा राखीव असलेल्या गटात दत्ताशेठ भालेघरे यांना कुणबी प्रमाणपत्राचा आधारावर मानकुमरे यांनी लॉन्चिंग केलेले पाहायला मिळत आहे.तसे पाहायला गेले तर मानकुमरे यांच्याकडे देखील कुणबी प्रमाणपत्र आहे.मात्र त्यांचे प्रबळ विरोधक म्हसवे गटात सक्रिय झाल्याने मानकमरे यांनी नवी राजकीय खेळी खेळत भालेघरे यांना

उमेदवारीसाठी बाहेर काढले आहे. परंतु भालेघरें बरोबरच दत्ता शेठ गावडे देखील जिल्हा परिषदेसाठीच इच्छुक म्हणून मुलाखतीस हजर होते. त्यामुळे वसंतराव मानकुमरे यांची नेमकी खेळी काय सुरू आहे? हे येत्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.

    म्हसवे जिल्हा परिषद गटात “शेठ” मंडळींचीच चलती

या गटात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ताकद लावलेली असल्याने मुंबईस्थित जावळीतील अनेक शेठ मंडळी भाजपच्या गोटातून उतरवले गेले आहेत. राष्ट्रवादीकडून खर्शीबारामुरे  गणातून  विठ्ठल शेठ गोळे हे इच्छुक आहेत, तर भाजपकडून दत्ता शेठ भालेघरे व दत्ता शेठ गावडे हे जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे म्हसवे गटात सध्या “शेठ” मंडळींचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button