राजकीय

कृषीकन्या, गोरक्षक कल्पना भानुदास फरांदे यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी जवळपास निश्चित

उद्या शक्तिप्रदर्शन करीत भरणार उमेदवारी अर्ज.

कुडाळ :वास्तवनामा वृत्तसेवा

जावली तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडी येथील कृषिकन्या व गोरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पना भानुदास फरांदे – रासकर यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, उद्या मंगळवारी त्या शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कुडाळ गण, सायगाव गण व ११ गावे येथील दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांशी व मतदारांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या असून कुडाळ गटातील त्यांच्या उमेदवारीस सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवला आहे.

तीन पिढ्यापासून आनेवाडी स्टँडवर असलेल्या लाकडी चरख्याच्या पुड्यांऊसाच्या रसवंतीगृहामुळे त्यांच्या कुटुंबाचा आनेवाडीसह रायंगाव,महामुलकरवाडी, सायगाव, खर्शी, प्रभुचीवाडी, मोरघर, पवारवाडी दुदुस्करवाडी, दरेखुर्द, मोरेवाडी ,महिगांव, बेलावडे,कुडाळ परिसरात त्यांचे कुटुंबाचा वैयक्तिक स्नेह मित्रपरिवारासह नातेवाईक आहेत.

शेतीतील आवड व सेंद्रिय शेतीतील विविध प्रयोगामुळे त्यांची ओळख कृषीकन्या म्हणून झाली आहे, त्यांना देशी गाई संगोपनाची आवड असल्याने व सोडून दिलेल्या गाईचे ही त्यांनी संगोपन केल्याने गोरक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील महिलेला राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांसाठी विचारना केल्यामुळे भागातील शेतकरी कष्टकरी व मतदारांना व पक्षातील कार्यकर्त्यांना विशेष आनंद झालेला आहे.या कृतीतून पक्षाने एक सकारात्मक संदेश देण्याचे काम केले आहे.

त्यांचे माहेरही कुडाळ असल्याने कुडाळ गावातील ग्रामस्थ व मतदार बंधू भगिनी  सहकार्याच्या भूमिकेत आहेत. त्या विद्यमान आनेवाडी ग्रामपंचायत सदस्यदेखील आहेत.त्यामुळे त्यांच्या उमेदवाराने तगडे आव्हान निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button