राजकीय

आंबेघर तर्फ मेढा गणात नव्या उमदया अतिष कदमांची एन्ट्री

केळघर : वास्तवनामा वृत्तसेवा

     केळघर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असताना आंबेघर तर्फ मेढा गणातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंबेघर तर्फ मेढा  गणात नव्या उमद्या अतिश कदम यांनी दमदार एन्ट्री केली आहे. या गणातून इतर मागास प्रवर्ग पुरुष आरक्षित असलेल्या या गणान ते उमेदवारी लढू इच्छित आहेत. जवळपास त्यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून निश्चित केली आहे.

कुसुंबी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या आंबेघर तर्फ गणात भाजपकडून रवींद्र सल्लग यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे .तर राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाकडून वरोशी गावचे युवा कार्यकर्ते आतिश कदम यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. त्यांना संधी देण्याचे ठरवले आहे.यानिमित्ताने कदम यांची या गणात दमदार एन्ट्री झाली आहे. शशिकांत शिंदे यांचे कदम हे निष्ठवंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील संतोष कदम हे अनेक वर्षांपासून शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत .

आरक्षण जाहीर झाल्यापासून आतिष कदम यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. त्यानुसार गणातील गावागावांमध्ये त्यांनी यापूर्वीच भेटीगाठींवर भर दिला होता. सामाजिक कामात देखील त्यांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button