प्रशासकीय

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांची १३ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबई : वास्तवनामा वृत्तसेवा

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद
आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी
आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या
कार्यक्रमानुसार १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत
प्रक्रिया पार पडणार आहे.एकूण ३२ जिल्हा परिषद
आणि ३३४ पंचायत समित्यांमधील जागांसाठी ही
सोडत काढली जाणार आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचा देखील समावेश असून, आरक्षण सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्यातील नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे .आठ वर्षांपेक्षा अधिक कालावधी या निवडणुकांना झाला असून, अखेर आरक्षण सोडतीनंतर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याची ही महत्त्वाची पायरी ठरणार आहे.
आरक्षण सोडतीनंतर जिल्हाधिकारी प्राथमिक
आरक्षण जाहीर करतील. त्यावर हरकर्ती व सूचना
घेण्यात येतील. त्यानंतर विभागीय आयुक्त अंतिम
अहवाल शासनाकड़े सादर करतील.

३ नो्हेंबर रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, ग्रामिण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणाचा तिढा
सुटणार आहे.

जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार असून, पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत प्रक्रिया ही तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पातळीवर पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button