सामाजिक

यशश्री अँक्वाच्या माध्यमातून सायगाव विभागाला मिळणार स्वच्छ पाणी : मच्छिंद्र मुळीक

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा

    स्वच्छ पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब असून दूषित पाण्यामुळे अनेक आजार होत असतात. या उद्देशातून जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ येथील उद्योजक शिवाजी शिवणकर व मयूर शिवणकर यांच्या माध्यमातून उभे राहिलेल्या यशश्री अँक्वा मधून सायगाव विभागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे. असे प्रतिपादन नेते मच्छिंद्र मुळीक यांनी केले.

खशीतर्फ कुडाळ येथे यशश्री अँक्वाचे उद्घाटन मुळीक तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सोनगाव-रायगाव या राज्य मार्गावर खर्शीतर्फ कुडाळ येथे हा प्लांट उभारण्यात आला असून अगदी रस्त्याच्या कडेला असल्याने केवळ एक रुपयात एक लिटर स्वच्छ फिल्टरड पाणी या अँक्वामधून नागरिकांना पिण्यास मिळणार आहे.त्याचा देखील शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

     शिक्षण सेवेत कार्यरत असलेले शिवाजी शिवणकर यांच्या व्यवसायिक व कल्पकतेतून ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी हा अँक्वा उद्योग सुरू करण्यात आला असल्याचे जेष्ठ पत्रकार दत्तात्रय पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राजाभाऊ गाढवे, डॉक्टर विकास फरांदे, भानुदास भोसले गुरुजी, मंगेश महामुलकर, दीपक फरांदे, प्रमोद दीक्षित, विनायक चोरट, उषा शिवणकर, मयूर शिवणकर, सिद्धेश शिवणकर, पिंटू भोसले गुरुजी, पोलीस हणमंत शिवणकर ,संदीप किर्वे,धैर्यशील भोसले,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button