प्रशासकीय

बेकायदेशीर सावकारी विरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक

कारवाईबाबत बाबत जिल्हा उपाध्यक्ष देवदास जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा :वास्तवनामा वृत्तसेवा

    सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर सावकारी फोफावत आहे. विनापरवाना कर्जवाटप करून शेतकरी, कामगार, लहान व्यापारी यांना जुलमी व्याजदराने पैसे दिले जात आहेत. यामुळे कर्जदारांचे आर्थिक शोषण होत असून, वेळेत व्याज फेडता न आल्यास जमिनी, घरे, शेतीचे हक्कपत्र जबरदस्तीने लिहून घेण्याचे प्रकार वाढले आहेत.त्यामुळे आता अशा बेकायदेशीर सावकारी विरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.

या संदर्भात  रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवदास जाधव यांनी अशा बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आज केली.

निवेदनात म्हटले आहे कीअनेक ठिकाणी सावकारांकडून कायद्याने परवानगी नसताना कर्ज वाटप होत आहे.,व्याजदर हा प्रचलित कायद्यानुसार नसून अत्यंत जुलमी व अन्यायकारक आहे.कर्जदारांना धमक्या देणे, तोंडी-शारीरिक त्रास देणे, मानसिक छळ करणे असे प्रकार देखील घडत आहेत.तर शेतकऱ्यांच्या जमिनी व मालमत्ता सावकारांच्या नावे बेकायदेशीररीत्या लिहून घेतल्या जात आहेत.या गंभीर प्रकरणात प्रशासन अथवा पोलिसांकडून ठोस व तात्काळ कारवाई होताना दिसत नाही.

त्यामुळे आमची मागणी आहे की, जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारांविरुद्ध विशेष मोहीम प्रशासनाने हाती घ्यावी.तसेच विनापरवाना सावकारी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष प्रकाश साबळे,प्रशांत मोरे,यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button