राजकीय

शिवसेनेच्या प्रशांत तरडेंचा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन प्रचार

दुपारच्या वेळी खाल्ली शेतकऱ्यांसोबत बांधावर बसून चटणी भाकरी

कुडाळ वास्तवनामा वृत्तसेवा

मी कारखानदार नसून सर्वसामान्य शेतकऱ्याचा सुपुत्र आहे. मला शेतकऱ्यांच्या व्यथा माहित आहेत असे असे मत शिवसेना उबाठाचे कुडाळ गणाचे उमेदवार प्रशांत तरडे यांनी व्यक्त केले. प्रशांत तरडे यांनी कुडाळ गणात शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन आपली प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून प्रशांत तरडे यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा दिसत आहे.

कुडाळ गणातील सर्व गावांमधून प्रशांत तरडे यांनी प्रचाराच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात केली आहे. अशावेळी सांगवी तसेच कुडाळ शिवारातील शेतकऱ्यांची सध्या शेतीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत तरडे यांनी या पंचक्रोशीतील शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांशी हितगुज करीत त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला. मशाल चिन्ह समोरील बटन दाबून आपणास बहुमताने निवडून द्यावे असे भावनिक आवाहन यावेळी उमेदवार प्रशांत तरडे यांनी शेतकरी बांधवांना केले.

दरम्यान दुपारच्या वेळी पानस कुडाळ शिवारातील शेतकऱ्यांशी भर उन्हात संवाद साधताना या शेतकऱ्यांचा सोबत प्रशांत तरडे यांनी दुपारच्या वेळी चटणी भाकरी खात त्यांच्यात सहभागी झाले. यावेळी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा देखील तरडे यांनी मारल्या.व निवडणूक प्रचार केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button