राजकीय

कुडाळ गणात प्रशांत तरडे यांनी दोन शिंदेंसमोर केले कडवे आव्हान उभे

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा
कुडाळ पंचायत समिती गणात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होईल असे म्हणणाऱ्या सर्वच राजकीय मंडळींना प्रशांत तरडे सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने ऐन निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात या दोन्ही कुडाळच्या शिंदें समोर कडवे आव्हान उभे केले आहे

कमळ आणि तुतारीच्या नावाखाली वर्षानुवर्ष सुरू असलेला सत्तेचा खेळ, खोटा दिखावा आणि स्वार्थी राजकारण  जनतेसमोर उघड करण्यावरच तरडे यांनी आपल्या प्रचारात मुद्दा बनवला होता.सत्ताधारी पक्षाच्या या बनावाला थेट आव्हान देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे उमेदवार प्रशांत तरडे यांनी मशाल हाती घेत परिवर्तनाची ठिणगी कुडाळ गणात पेटवली आहे.

कमळ उमलतं पदासाठी,तर तुतारी वाजते सत्तेसाठी,मात्र जनता विचारते-काम कुठे, विकास कुठे? असा सवाल उपस्थित करत प्रशांत तरडे यांनी विरोधकांवर गेली आठ दिवस प्रचारात जोरदार  हल्ला चढवला होता. प्रत्येक निवडणुकीत तेच चेहरे, तीच नावं आणि तीच आश्वासनं पाहून जनता आता कंटाळली असून,”पद यांचंच, उमेदवारी यांचंच” या राजकारणाला यावेळी मतदार पूर्णविराम देण्याच्या तयारीत आहेत.

धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती असा सामना तरडे यांनी बनवला असून,मी कुठल्या घराण्याचा वारसदार नाही, तर सर्वसामान्य जनतेतून उभा राहिलेला शिवसैनिक आहे. त्यामुळे गणातील सर्वसामान्य जनताच माझी खरी ताकद आहे.असे मत तरडे यांनी व्यक्त प्रचारात व्यक्त केले होते.

विरोधकांना वाटते आमच्याकडे ताकद नाही; पण त्यांना माहीत नाही की शिवसैनिकांची निष्ठा हीच आमची खरी ताकद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button