
करहर : वास्तवनामा वृत्तसेवा
खर्शी-बारामुरे पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विठ्ठल शेठ गोळे यांनी आपल्या होमपीच असलेल्या खर्शीबारामुरे या पंचक्रोशीतील गावांमधील नागरिकांशी प्रचारादरम्यान संवाद साधला. यावेळी या पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच नारा देत विठ्ठलशेठ गोळे यांनाच निवडून आणणार अशी ग्वाही दिली. यामुळे प्रति पंढरपूर करहर येथील विठ्ठल मतदारांच्या रूपाने विठ्ठलालाच पावणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बुधवारी म्हसवे गटातील खर्शीबारामुरे पंचायत समिती गणाचे उमेदवार विठ्ठल शेठ गोळे त्याचबरोबर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संदीप पवार यांनी करहर येथील मतदारांशी संवाद साधला व यावेळी रॅली काढली. अगदी घरोघरी जाऊन मतदारांशी विठ्ठल शेठ गोळे, संदीप पवार यांनी संवाद साधत तुतारी चिन्ह समोरील बटन दाबून विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले.
यावेळी माजी सभापती मोहनराव शिंदे, बुवासाहेब पिसाळ, प्रतापगड कारखाना संचालक रामदास पार्टे, गोपाळ बेलोशे, यांच्यासह असंख्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.



