सर्वसामान्य मतदारांनी-जनतेनीच माझी निवडणूक घेतली हातात:- प्रशांत तरडे
बेलवडे-सोनगाव गावात प्रचार रॅलीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा
मी स्वाभिमानी व कट्टर शिवसैनिक आहे. आतापर्यंत माझ्या वैक्तिक स्वार्थासाठी कोणापुढेही न झुकता सर्वसामान्यांसाठी माझा लढा मी कायम ठेवत आलो आहे. त्यामुळेच कुडाळ पंचायत समिती गणाची माझी उमेदवारी, माझी ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी आता हातात घेतलेली आहे. त्यामुळे माझा विजय या गणातून निश्चित आहे. असे मत उबाठा गटाचे कुडाळ गणाचे उमेदवार प्रशांत तरडे यांनी व्यक्त केले.
उमेदवार प्रशांत तरडे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ गणातील बेलवडे,आर्डे, पानस, सोनगाव गावात आज प्रचार रॅली काढली. त्यादरम्यान सोनगाव येथे ते मतदारांशी बोलत होते. एकीकडे संस्था ताब्यात असलेले तेच तेच प्रस्थापित उमेदवार लोकशाहीत इतरांचा गळा आवळून निवडणुकीत उतरले आहेत. अशा प्रस्थापितांना गणातील मतदार वैतागले आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व जनतेसाठी धडपडणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याची ही निवडणूक गणातील मतदारांनी, जनतेने हातात घेतली असून त्यांच्या जोरावरच माझा विजय या गाणातून निश्चित मी मानत आहे. असे तरडे म्हणाले.

यावेळी बेलावडे,आर्डे, पानस, गोपालपंतांचीवाडी,सांगवी, सोनगाव पर्यंतच्या गावांमध्ये घरोघरी मतदारांच्या गाठीभेटींवर तरडे यांनी भर देत मतदारांना विनम्रपणे मशाल चिन्हा समोरील बटन दाबून आपणास निवडून द्यावे असे आवाहन केले.



