म्हसवे गणातील उमेदवार शिल्पा शिंदे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा :माजी सभापती मोहनराव शिंदे

हुमगाव : वास्तवनामा वृत्तसेवा
पंचायत समिती म्हसवे गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या सौ.शिल्पा शिंदे यांना म्हसवे गणातून वाढता पाठिंबा दिसत असून विरोधी उमेदवाराच्या नाराजीचा फायदा शिल्पा शिंदे यांनाच मिळणार असा विश्वास माजी सभापती मोहनराव शिंदे यांनी व्यक्त केला.म्हसवे गणातील गावांना भेटी देऊन घरोघरी प्रचार केला त्यावेळी मतदारांशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या व चर्चा केली.

म्हसवे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या शिल्पा शिंदे या उच्चशिक्षित आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे विनम्र अशा उमेदवारा असल्याने त्यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिल्पा शिंदे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी उत्कृष्ट असे कार्य केले आहे. तसेच त्या धार्मिक वृत्तीचा असल्याने त्यांनी अनेक धार्मिक कार्यांसाठी मदतीचा हात देखील पुढे केलेला आहे .
आषाढी एकादशीच्या वारीला त्या पायी वारीत चालत जाऊन वारकऱ्यांची सेवा देखील करत असतात, व त्यांना मदतीचा हात पुढे करत असतात. त्यामुळे शिल्पा शिंदे यांना वारकरी संप्रदायाचा देखील पाठिंबा मिळत आहे. असेही मोहनराव शिंदे यावेळी म्हणाले. शिल्पा शिंदे यांच्या पाठीमागे प्रचार दौऱ्यात भलेही कार्यकर्ते कमी असतील परंतु अंतर्गत मतदार त्यांच्यासोबतच असल्याचे चित्र बघायला मिळेल. असा विश्वास देखील मोहनराव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
सौ.शिल्पा शिंदे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे,माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, तेजस शिंदे हे नेते जीवाचे रान करीत आहेत. त्यांच्यासाठी प्रचार दौरा देखील करीत आहेत. त्याचा फायदा शिल्पा शिंदे यांना निश्चित रूपाने होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करत आहे आहेत.



