सायगाव गणात कसं ‘मुळीक गुरुजी म्हणतील तसं’
सायगाव विभागातील सेवानिवृत्त शिक्षकांची बैठकीत निर्णय

सायगाव : वास्तवनामा वृत्तसेवा
सायगाव पंचायत समिती गणातून शिक्षक संघटनेचे नेते मच्छिंद्र मुळीक हे आपल्या पत्नीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र अखेरच्या क्षणी चारुशीला विवेक पवार यांना पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. तरी देखील मुळीक गुरुजींनी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानून त्यांच्या आदेशाने पत्नी अश्विनी मुळीक यांचा उमेदवारी अर्ज दाखल न करता प्रचारात आघाडी घेतली.यानिमित्ताने त्यांनी घेतलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची बैठकीत शिक्षकांनी एकच नारा दिला “सायगाव गणात कसं मुळीक गुरुजी म्हणतील तसं”
पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत अश्विनी मुळीक यांचे नाव आघाडीवर होते.मात्र अखेरच्या क्षणी हे नाव मागे पडून चारुशीला विवेक पवार यांना सायगाव गणाची उमेदवारी देण्यात आली. तरी देखील कोणतीही नाराजी व्यक्त न करता मुळीक गुरुजींनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी घेतली. त्यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी मुळीक या देखील चारुशीला पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाल्या.
शिक्षक संघटनेचे नेते म्हणून कामकाज पाहिलेले मुळीक गुरुजी यांनी सातारा येथे सायगाव गणातील सेवानिवृत्त शिक्षकांची बैठक आयोजित केली.या बैठकीत सर्व शिक्षकांनी भाजपच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्णय घेतला. यावेळी बैठकीस सेवानिवृत्त शिक्षक सुनील राजमाने, प्रशांत कदम, लक्ष्मण कदम, विजय पवार, नंदकुमार मोरे,ज्ञानेश्वर आगुंडे, मिलिंद जगताप,दादा पाटील, संजय निकम, चेअरमन धैर्यशील निकम, धैर्यशील मोहिते, यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांनी आदेश दिल्यामुळे त्यांच्या आदेशानव्ये मी उमेदवारी अर्जही दाखल केला नव्हता, पुढे कुठेही त्यांच्याकडून आमच्या कुटूंबाला न्याय मिळेल, या भावनेतून आज आमचे संपूर्ण मुळीक कुटुंब या निवडणुकीत भाजपने दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारात उतरलेले आहे.
सौ.अश्विनी मुळीक



