राजकीय

खर्शी-बारामुरे पंचक्रोशीत “एकच नारा विठ्ठलशेठ ना निवडून आणणार”

राष्ट्रवादी उमेदवार विठ्ठलशेठ गोळे यांनी खर्शी-बारामुरे,पिंपळी, रामवाडी पंचक्रोशीतील मतदारांशी साधला संवाद

करहर : वास्तवनामा वृत्तसेवा

   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खर्शीबारामुरे गणाचे उमेदवार विठ्ठलशेठ गोळे यांनी आपल्या होमपीच असलेल्या खर्शी-बारामुरे,पिंपळी, रामवाडी या पंचक्रोशीतील गावांमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी या पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच नारा देत विठ्ठल शेठ यांनाच निवडून आणणार अशी ग्वाही दिली.

उमेदवार विठ्ठलशेठ गोळे हे मूळचे खर्शी बारामुरे गावचे रहिवासी असून त्यांचा या पंचक्रोशीत सर्वांशी दररोजचा संबंध येत असतो. मंगळवारी या पंचक्रोशीतील पिंपळी, पवारवाडी, बिरामणेवाडी, बलकावडेवाडी,पार्टेवाडी, रामवाडी गावातील मतदारांशी उमेदवार विठ्ठलशेठ गोळे यांनी थेट संवाद साधत या गावांमधून घरोघरी त्यांनी जनसंपर्क करीत प्रचार रॅली काढली. यावेळी मतदारांच्या अडीअडचणी समजावून घेत आपण त्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही उमेदवार विठ्ठलशेठ गोळे यांनी यावेळी दिली.

रॅलीस पंचक्रोशीतील नागरिकांनी मतदारांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button