राजकीय

चारुशीला पवारांना सायगाव गणातून वाढता पाठिंबा

खर्शी तर्फ कुडाळ-सायगाव विभागातील गावांचा प्रचार दौरा संपन्न

सायगाव : वास्तवनामा वृत्तसेवा

  एक सामान्य कुटुंबातील महिला उमेदवार म्हणून सायगाव गणाच्या सौ.चारुशीला पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या विनम्र, शांत स्वभावामुळे त्यांना सायगाव गणात पाठिंबा वाढत असून संपूर्ण गणातून त्यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महिला कार्यकर्त्यांसह सर्वांनी कंबर कसलेली पाहायला मिळत आहे.आज त्यांचा खर्शी तर्फ कुडाळ, सायगावसह इतर गावांचा प्रचार दौरा संपन्न झाला.

सायगाव पंचायत समिती गणातून चारुशीला पवार या भाजप पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. आनेवाडी गावच्या सौ. पवार या  एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिला भगिनी आहेत.त्यांना भाजपने उमेदवारी दिली असून या उमेदवारीवर गणातील सर्वच मतदारांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून शिक्कामोर्तब केला आहे. व त्यांच्या पाठीशी भक्कम साथ उभी केलेली पाहायला मिळत आहे.

आज मंगळवारी रायगाव, खर्शी तर्फ कुडाळ, प्रभुचीवाडी, सायगाव, पवारवाडी, दुदुस्करवाडी, कदमवाडी, मोरेवाडी, दरेखुर्द या गावात त्यांचा प्रचार दौरा संपन्न झाला. या संपूर्ण गावांमधील आबालवृद्धांसह सर्व मतदारांनी चारुशीला पवार यांचे मनापासून स्वागत करीत “आमचे मत कमळालाच” म्हणत त्यांनाच पाठिंबा दर्शवला.

यावेळी प्रतापगड कारखाना माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील,मोहन भिलारे,संजय निकम,नितीन मोरे, विठ्ठल मोरे, उत्तम पवार, नाना पवार,जितेंद्र पवार ,अतुल भोसले, अश्विनी मुळीक यांच्यासह मान्यवर या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button