राजकीय

म्हसवे गणातील मतदार वाजवणार विजयाची तुतारी :संचालक बुवासाहेब पिसाळ

शिल्पा शिंदे यांची म्हसवे गणात प्रचारात जोरदार आघाडी

हुमगाव : वास्तवनामा वृत्तसेवा

 म्हसवे गटातील जनता सुज्ञ असून या जनतेला केवळ कागदावरच्या विकासाच्या गप्पा मारणारा जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य नको आहे. त्यामुळे या गटातील व म्हसवे गणातील मतदार यावेळी नक्कीच राष्ट्रवादी-शिव सेना उमेदवारांच्या विजयाची तुतारी वाजवणार असे प्रतिपादन बाजार समिती संचालक बुवासाहेब पिसाळ यांनी म्हसवे येथे केले.

म्हसवे गटातील शिवसेना उमेदवार संदीप पवार तसेच म्हसवे गणाच्या उमेदवार शिल्पा शिंदे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान ते बोलत होते.

यावेळी म्हसवे,शेते,सोमर्डी, जरेवाडी, वालुथ, कोलेवाडी हुमगाव या गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली.

दरम्यान सोमर्डी येथे मतदारांना आवाहन करताना सौ.शिल्पा शिंदे म्हणाल्या या विभागाचा विकास खऱ्या अर्थाने शशिकांत शिंदे मंत्री असताना तसेच त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्यामाध्यमातून करण्यात आला आहे. या हुमगाव विभागाने त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना भक्कम अशी साथ दिली आहे. अशीच साथ आ. शिंदे यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मलाही म्हसवे गणातून आपल्याकडून मिळावी अशी विनंती त्यांनी मतदारांना यावेळी केली.

दरम्यान प्रचार रॅलीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला. तर राम कृष्ण हरी ! आता वाजवा तुतारी..!!अशा घोषणा देत ही रॅली हुमगाव पर्यंत काढण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button