वसंतराव मानकुमरे हे लढवय्ये नेते आहेत :-मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
करंदी तर्फ कुडाळ येथे भाजप उमेदवारांची कोपरा सभा संपन्न

कुडाळ : वास्तवनामा वृत्तसेवा
वसंतराव मानकुमरे हे लढवय्ये नेते आहेत त्यांनी या भागाचा विकास केला आहे. घराघरात त्यांचे नातेसंबंध आहेत त्यामुळे मानकुमरे हे विजयी होणारच असा विश्वास नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला
करंदी तर्फे कुडाळ तालुका जावली येथे म्हसवे
जिल्हा परिषद गटातील भाजपाचे अधिकृत उमेदवार
वसंतराव मानकुमरे व म्हसवे गणाच्या उमेदवार
रेश्मा पोफळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.
यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हसवे गटाचे
उमेदवार वसंतराव मानकुमरे, म्हसवे गणाच्या
उमेदवार रेश्मा पोफळे माजी सभापती रविंद्र
परामणे, तानाजीराव शिर्के, दत्ता गावडे, सयाजीराव
शिंदे, संदीप परामणे व मान्यवर उपस्थित होते.
म्हसवे जिल्हा परिषद गटाचे गेले तीस वर्षे
नेतृत्व करणारे वसंतराव मानकुंबे हे लढवय्या नेते
आहेत त्यांनी गेल्या 30-35 वर्षाच्या आपल्या
राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्य जनतेच्या
हितासाठी अनेक आंदोलने केली मिळालेल्या
सत्तेच्या माध्यमातून त्यांनी गावागावात विकास
कामे केली आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य
जनतेच्या सुखदुःखात त्यांचा नेहमीच सहभाग
राहिला आहे तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांच्या
असणारे संबंध चांगल्या जिव्हाळ्याचे आहेत
विरोधकांनी कितीही भूलथापा दिल्या तरीसुद्धा
मानकुमरे भाऊंचे योगदान जनता विसरणार नाही
आणि त्यांना या निवडणुकीत सुद्धा विक्रमी मताने
विजयी करेल असा विश्वास नामदार शिवेंद्रराजेने
व्यक्त केला.
विरोधी उमेदवाराचे ब्लॅकमेलिंगचे हेच धंदे : त्याचे डिपॉझिट जप्त करून पाडा – मानकुमरे
गेले 35 वर्ष जावली तालुक्यात आपण विविध
विकासकामे राबवत आहोत. सर्वसामान्य जनतेला
न्याय देण्याचा प्रयत्न या कालावधीत केला आहे
त्यामुळे आपल्याला निवडणुकीची अजिबात सुद्धा
चिंता नाही विरोधी उमेदवाराचे कर्तत्व काय त्याचे
उद्योग सर्वज्ञात आहेत आत्तापर्यंत ब्लॅकमेलिंग
शिवाय यांनी केले काय विरोधी पक्षाने आपल्या
विरोधात उमेदवार देताना तरी किमान त्याची पात्रता
बघून घ्यायला पाहिजे होतं. या उमेदवाराचे डिपॉझिट
जप्त करून त्याला गाडा अशी घनाघाती टीका
वसंतराव मानकुमरे यांनी केली.
भाजपाचे तालुका प्रवक्ते सुरेश गायकवाड यांनी
सूत्रसंचालन करत भारतीय जनता पक्षाचे
ध्येयधोरणे नामदार शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून
होणारे विकास कामे वसंतराव मानकुमरे भाऊ
यांच्या कार्याची माहिती दिली.यावेळी करंदी ग्रामस्थांच्या वतीने प्रतापगड कारखान्याचे संचालक बाळासाहेब निकम यांनी करंदी ग्रामस्थ एकजुटीने भारतीय जनता पक्षाच् पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही दिली.



